केंद्र सरकारने कृषी विरोधी काळा कायदा आणल्याच्या विरोधात भारत बंदच्या समर्थनार्थ बल्लारपूर आत राजू झोडे यांच्या नेतृत्वात कडकडीत बंद करून बंद सफल करण्यात आले. दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकारने नवीन कृषी विधेयक काढून शेतकऱ्यांना संपवण्याचे कट कारस्थान करत आहे.
केंद्र सरकार अदानी अंबानी सारख्या उद्योगपतींना मदत करीत असल्याचा आरोप उघड झालेला आहे. अशातच शेतकऱ्यांना आतंकवादी संबोधने, शेतकऱ्यांवर अश्रुधारा यांचा वापर करणे, लाठीचार्ज करणे असे कृत्य मोदी सरकार करत आहे. यावरून हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे सिद्ध झाले आहे.
अशा या निर्दय सरकारला हाणून पाडा असेही राजू झोडे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून सांगितले आहे.
भारत बंद चे आंदोलनात शहरातील संपूर्ण जनतेनी उस्फूर्तपणे बंद पाडून या बंदला समर्थन केले आहे. शहरातील संपूर्ण दुकाने असता पुणे बंद ठेवून या सरकारचा जाहीर निषेध आंदोलनकर्त्यांनी केला. भारत बंदच्या आंदोलनात या बंदला यशस्वी करण्यासाठी राजू झोडे पवन भगत संपत कोरडे सचिन पावडे भगतसिंग झगडे जॉकिर खान मनोज बेले नरेश डोंगरे भुषण पेटकर गुरु स्नेहल साखरे अनिरुप पाटिल यांनी मोलाचे योगदान दिले.
