डाॅ. शीतल आमटे प्रकरणाचा तपास घातपाताच्या दिशेने?; 16 जण ताब्यात तर आमटे कुटुंबियांवर ओढावले आणखी एक संकट !#sheetal-amte - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



डाॅ. शीतल आमटे प्रकरणाचा तपास घातपाताच्या दिशेने?; 16 जण ताब्यात तर आमटे कुटुंबियांवर ओढावले आणखी एक संकट !#sheetal-amte

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : वरोरा -चंद्रपूर 


बाबा आमटे यांची नात, महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस घातपाताच्या दिशेने तपास करत आहेत. यासंदर्भात आनंदवनातील जवळपास 16 लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदवलं आहे.

डॉ. शीतल आमटे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासूनच पोलिसांनी गंभीरतेने तपास सुरू केला आहे. एकंदर घटनाक्रम आणि घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद बाबींवरून आत्महत्याच असावी, असं बोललं जात असलं तरी पोलिसांनी या प्रकरणात तपासाला वेगळं वळण दिलं आहे.

डॉ. शीतल यांचा घातपात तर झाला नसावा, ही बाबही पोलीस पडताळून पाहत आहेत. यासाठी आत्महत्येपूर्वी शीतल यांना कोण भेटले, त्यांच्यात काय चर्चा झाली, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी आनंदवनातील 16 जणांचे जबाब नोंदवले.

शीतल आमटे यांच्या मृत्यूनंतर काही गोष्टीसाठी आणि अवयव तपासणीसाठी फाॅरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल सोमवारी पोलिसांना प्राप्त होण्याची शक्यता आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे.


ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबरला आत्महत्या केली. या धक्क्यातून सावरत नाही तर आमटे कुटुंबियांवर आणखी एक संकट ओढावलं आहे.

प्रकाश बाबा आमटे यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे आणि त्यांचा मुलगा अनिकेत आमटे या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. या दोघांची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आली आहे. मंदाकिनी आमटे आणि विकास आमटे आता क्वारंटाईन झाले आहेत.

महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प चालवला जातो. प्रकल्पाचा कारभार प्रकाश बाबा आमटे आणि त्यांच्या कुटुंबातील बाकीचे चालवतात. यामध्ये हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक म्हणून प्रकाश आमटेंचे चिरंजीव अनिकेत आमटे काम पाहतात.

दरम्यान, कोरोना झाल्यामुळे अनिकेत आमटे आणि मंदाकिनी आमटे या आराम करणार आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या कामात ते काही दिवस लक्ष घालणार नाहीत.

Pages