वणी येथील प्रसिद्ध श्री रंगनाथ स्वामी देवस्थानात विविध कार्यक्रम सातत्याने सुरूच असतात मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नियमांचे काटेकोर पालन करीत अल्पशा लोकांतच वैकुंठ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते व अतिशय उत्कृष्ठ पने सदर कार्यक्रम पार सुद्धा पडला यावेळी मंदिरातील गन्मान्य मंडळी उपस्थित होत्या.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने काही निकष लावले आहे, श्री. रंगनाथ स्वामी देवस्थान येथील 28 नोव्हेंबर रात्रीला वैकुंठ मोहत्सव साजरा करण्यांत आला.दरवर्षी प्रमाणे भजन पूजन, कीर्तन, हरीहर मिलन अशा विविध कार्यक्रम करून मोठ्या संख्येने या परीसरातील नागरिक एकत्र येतात मात्र यावर्षी अल्पशा मंडळीत उत्साहाताच साजरा करण्यात आला व देवाला कोरणाचे संकट लवकरात लवकर जाऊदे असे साकडे टाकण्यात आले.
महोत्सवादरम्यान शासकीय नियमाचे पालन करून मोजक्या भक्त गणाच्या व सदस्यांच्या उपस्थिती उत्सव साजरा करण्यात आला. वणीचे दैवत असलेले श्री. रंगनाथ स्वामी यांच्या नावाने दरवर्षी कार्तिक चतुर्थीला वैकुंठ मोहत्सव साजरा केला जातो.या श्री रंगनाथ स्वामी च्या नावाने वणीत यात्रा सुद्धा भरत असते आणि सर्व भक्तगण याला सहकार्य करीत असतात मंदिराच्या जिर्णोद्धारा करीत मदतीचे आवाहन सुद्धा मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.
🛕 श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्राची सुरवात :
अजित गोपाल खंदारे व अक्षय चरणजी करसे यांच्या सहकार्याने सदर उपक्रम सुरू करण्यात आला असून या करिता मंदिरातील विश्वस्त व भक्तगणांनी उत्कृष्ठ कार्यक्रमाला सहकार्याची थाप दिली आहे, या माध्यमातून युवा वर्ग भक्तिमय वातावरणात राहण्यास मदत होईल.
