ब्रम्हपूरी- वडसा रोडवर आय सी आय बँक समोर असलेल्या योगेश ऑटोमोबाईल दुचाकी दुरुस्ती दुकान अनेक वर्षापासुन सुरू आहे.अचानक गुरूवारी रात्री ११:०० वाजता दुकानाला आग लागली.या मध्ये दुकानातील दुरुस्ती साठी असलेले वाहन व सामुग्री जळुन खाक झाली.
यामध्ये दोन-तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असून योगेश विनायक कोलते वर उपासमारीची वेळ आली आहे.या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता.
अचनाक व्यवसाय बंद झाल्याने योगेश मदतीसाठी शासनाकडे व राजकीय लोकप्रतिनिधी कडून अपेक्षा बाळगून आहे.अशामध्येच आपले दुःख आपल्याच लोकांना समजतात म्हनतात त्याच प्रमाणे नागपूर येथील टुव्हिलर संघटना व ब्रम्हपूरी टुव्हिलर संघटना हे योगेशच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
योगेशला नागपूर टुव्हिलर असोसिएशन कडुन ११,००० रूपये व ब्रम्हपूरी टुव्हिलर असोसिएशन कडुन १०,०००रूपये अशी आर्थिक मदत देण्यात आले.यावेळी नागपूर टुव्हिलर असोसिएशन चे सचिव निशिकांत पोहनकर,नुतन बिसेन, गणेश कुबडे,अरूण कुथे, गिरीधर गुरपूडे, संदिप माकडे,वीशाल राखडे,प्रविण वाघमारे,आदी सदस्य उपस्थित होते.
