विवाहित तरुणाचा अपघातात मृत्यू #road-accident - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



विवाहित तरुणाचा अपघातात मृत्यू #road-accident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर -


चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या बोथली ते काजळसर रस्त्यावर रामकृष्ण खोब्रागडे यांच्या शेतात पळसाच्या झाडाजवळ वळणावर दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघातात त्याचा जागीच म्रुत्यु झाल्याची घटना उघडकीस आली.

गोकुल शिवराम चौधरी रा.पेंढरी (को) वय ४५ वर्षे असे म्रुतकाचे नाव आहे हा बोथली येथे नातेवाईकांच्या येथे तेरवी आला होता काल दि.२९ नोव्हेंबर ला तेरवी कार्यक्रम आटोपून सायंकाळच्या सुमारास गावाकडे आपल्या हिरो होंडा स्लेंडर प्लस दुचाकी क्रमांक m.h.31-bo-6932 ने निघाला .

असता अडेगाव फाट्याचे समोर रामकृष्ण खोब्रागडे यांच्या शेताजवळील वळणावर दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने सरळ पळसाचे झाड व रस्त्याचे दगडाला धडक मारुन रस्त्याचे बाजूला पडला व या दुर्दैवी अपघातात त्याचा जागीच म्रुत्यु झाला .सदर घटना ही रात्री ची असल्याने तसेच रस्त्यावरील भुतगांज्याचे वनस्पती असल्याने ही बाब रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांंच्या निदर्शनास आली नाही व मदत मिळु शकली नाही सदर बाब ही आज दि.३० नोव्हेंबरला उजेडात आली.

चिमूर पोलीस घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणी साठी उपजील्हा रूग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले होते.पंचनाम्याच्या वेळी हेड कॉन्स्टेबल विलास निमगडे , पो.का.रोशन तामशेटवार,सचिन खामनकर अमलदार, सैनिक सचीन गायकवाड, शेख ड्रायव्हर पोलीस उपस्थीत होते . पुढील तपास हेड कॉन्स्टेबल वीलास नीमगडे करीत आहेत. म्रुतकाचे मागे पत्नी व बराच मोठा आप्त परिवार आहे म्रुत्यु मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pages