दारुच्या आहारी गेलेल्या इसमाची डोंगेघाट तलावात आत्महत्या #suicide - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



दारुच्या आहारी गेलेल्या इसमाची डोंगेघाट तलावात आत्महत्या #suicide

Share This
खबरकट्टा / ब्रम्हपूरी:- 


ब्रम्हपूरी शहरालगत असलेल्या चांदगाव रोडवरील डोंगेघाट तलावात एक इसमाने उडी घेऊन आत्महत्या केल्याचे घटना आज सकाळी उघडकीस आली.

सविस्तर माहिती नुसार मृतकाचे नाव संतोष पारधी वय ४२ देलनवाडी (ब्रम्हपूरी) हा दोन-तीन दिवसांपासून घरून निघून गेला होता.यांची तक्रार ब्रम्हपूरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती.मृतक हा दारू व्यसनाधीन असुन त्याला दारू पिण्यासाठी नाही मिळाली तर बेभानपणे वेडसर पणे कृती करत होते.आज सकाळी धावण्यासाठी गेलेल्या नागरिकांना तलावातील पाण्यामध्ये एक प्रेत तरंगत असलेले दिसले.

यांची माहिती ब्रम्हपूरी पोलिस स्टेशनला देण्यात आले.माहिती होताच ब्रम्हपूरी पोलिस घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह श्व्वछेदनासाठी ग्रामिण रुग्णालय ब्रम्हपूरी येथे पाठविण्यात आले.पुढील तपास पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल खोब्रागडे करत आहेत.

Pages