👆 मतदान आवाहन : मी मतदान केलं, तुम्ही पण करा -देवराव भोंगळेनागपूर पदवीधर निवडणूक : भाजप मतदारसंघ राखणार की काँग्रेस खाते उघडणार? आज मतदार ठरविणार उमेदवारांचे भवितव्य.. !!#devrao-bhongle - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



👆 मतदान आवाहन : मी मतदान केलं, तुम्ही पण करा -देवराव भोंगळेनागपूर पदवीधर निवडणूक : भाजप मतदारसंघ राखणार की काँग्रेस खाते उघडणार? आज मतदार ठरविणार उमेदवारांचे भवितव्य.. !!#devrao-bhongle

Share This





आज सुरू असलेल्या पदवीधर निवडणुकीतील मतदानाला, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पदवीधर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, या लोकशाहीच्या पर्वामध्ये आपण आपले अमूल्य मत देऊन सहभागी व्हावे.- हीच विनंती !

आपला - देवराव भोंगळे

खबरकट्टा / चंद्रपूर : 

नागपूर पदवीधर निवडणूक : भाजप मतदारसंघ राखणार की काँग्रेस खाते उघडणार? आज मतदार ठरविणार उमेदवारांचे भवितव्य.. !!

नागपूर विभागीय पदवीधर संघाच्या निवडणुकीसाठी उद्या मंगळवारी (ता.१) मतदान होणार असून भाजपपुढे आपला परंपरागत मतदारसंघ कायम राखण्याचे आव्हान आहे. भाजपने महापौर संदीप जोशी या युवा नेत्याला उमेदवारी दिली असून यंदा काँग्रेसने प्रथमच अधिकृत उमेदवार म्हणून अ‌ॅड. अभिजित वंजारी यांना रिंगणात उतरवले आहे. याशिवाय एकूण १९ उमेदवार लढत देत आहेत. 


राज्यात महाआघाडीचे सरकार असल्याने अ‌ॅड. अभिजित वंजारी यांनाही सर्व नेत्यांची साथ मिळत आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, गृहमंत्री अनिल देशमुख, विधान सभेचे अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल पटेल आदी बडे नेत्यांनी वंजारी यांच्यासाठी प्रचार केला आहे. 


शिवाय स्वतः वंजारी दीड वर्षांपासून मतदारसंघात तयारी करीत होते. याचा निश्चितच फायदा त्यांना होणार आहे. विशेष म्हणजे मागासवर्गीयांची एक गठ्ठा मते घेणाऱ्या बसपाने यावेळी उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे बसपची व्होट बँक कोणाच्या पारड्यात मते टाकतात त्यावरसुद्धा उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. विदर्भाच्या अनुशेषाचे अभ्यासक नितीन रोंघे हेसुद्धा भवितव्य आजमावित आहेत. 

🔰 असे आहेत उमेदवार - 

नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत १९ उमेदवार रिंगणात आहेत. अभिजित वंजारी ( भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ), संदीप जोशी (भाजप), राजेंद्रकुमार चौधरी (रिपाई , राहुल वानखेडे (वंचित बहुजन आघाडी), अ‌ॅड सुनिता पाटील (इंडियन नॅशनल मानवाधिकार पार्टी), अतुलकुमार खोब्रागडे, अमित मेश्राम, प्रशांत डेकाटे, नितीन रोघें, नितेश कराळे, डॉ. प्रकाश रामटेके, बबन ऊर्फ अजय तायवाडे, अ‌ॅड .मोहम्मद शाकीर अ.गफ्फार, सिए. राजेद्र भुतडा, प्रा.डॉ.विनोद राऊत, अ‌ॅड. वीरेंद्र कुमार जयस्वाल, शरद जीवतोडे , प्रा.संगीता बढे, संजय नासरे(सर्व अपक्ष).

Pages