🔴 अत्यंत महत्वाचे : सतर्क व्हा.. !!फेसबुक अकाउंट हॅक होण्याच्या प्रकारात वाढ :काही दिवसाअगोदार व्यापारी व आता देखील व्यापाऱ्याचेच फेसबुक अकाउंट हॅक चंद्रपूर : चंद्रपूरातही अनेक नामवंत व्यक्तींचे अकाउंट हॅक #facebook-hack - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



🔴 अत्यंत महत्वाचे : सतर्क व्हा.. !!फेसबुक अकाउंट हॅक होण्याच्या प्रकारात वाढ :काही दिवसाअगोदार व्यापारी व आता देखील व्यापाऱ्याचेच फेसबुक अकाउंट हॅक चंद्रपूर : चंद्रपूरातही अनेक नामवंत व्यक्तींचे अकाउंट हॅक #facebook-hack

Share This
खबरकट्टा / सतर्क : 
देशात सर्वत्र फेसबुक व व्हाट्सऍप चे जाळे चांगलेच पसरले असून आता नवनवीन टेकनोलॉजी चा वापर करीत आधुनिक रित्या पैशाची देवाण घेवाण ट्रान्सफर पद्धतीने करत असतात आता मात्र हॅकर्स सक्रिय झाले की काय? अशाच चर्चा रंगतांना दिसत असून चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील अनेक बड्या व्यापाऱ्यांचे व दिग्गज्जांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. 

या हॅक झालेल्या खात्याद्वारे त्यांच्या फ्रेंड्स लिस्ट मधील परिचयातील मंडळींना दवाखान्यात असल्याचे किंवा इतर कारणे सांगून ऑनलाईन पैशाची मागणी मॅसेज द्वारे करीत आहेत. असे असताना सदर घटना माहिती होताच त्यांनी निकटवर्तीय मंडळींना सोशल मीडिया द्वारे व फोन द्वारे तात्काळ काळवून तात्काळ सावधानतेचा इशारा देऊन कोणताही आर्थिक व्यवहार करू नये असा सल्ला दिला आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील वणीत काही दिवसा अगोदर एका दिग्गज व्यापारी चे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची घटना घडली होती दरम्यानच आता दुसरा सुद्धा व्यापारीच असून त्याने माझे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती सोशल मीडिया वर दिली असून कोणीही आर्थिक व्यवहार करू नये असे सुचविले आहे, दरम्यान अशा हॅकर्स ना पोलिसी खाक्या दाखवून धडा शिकविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

वणीसह परिसरातील व्यक्तींनी सावध राहून कोणताही आर्थिक व्यवहार करू नये तसेच अशा हॅकर्स चा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली असून यांचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

तसेच चंद्रपूर जिल्ह्यात खुद्द पोलीस अधीक्षकांच्याच नावे फेसबुक अकाउंट तयार करून पैश्याची मागणी करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. 


चंद्रपूर शहरातील नामवंत वकील अ‍ॅड. अभय कुल्लरवार यांच्या फेसबुक अकाउंट वरून पैश्याची मागणी होत होती. सधन व नामवंत व्यक्ति अचानक पैश्याची मागणी करू लागल्याने त्यांचे अनेक मित्र संभ्रमात पडले. अ‍ॅड. कुल्लरवार यांच्या काही मित्रांनी लगेच दूरध्वनी करून त्यांना याबाबत विचारणा केली असता, आपण फेसबुक मॅसेंजर वर कुणाशीही चॅट करत नाही तर आर्थिक मागणी करण्याचा सवालच नाही. तात्काळ त्यांनी फेसबुक मॅसेंजर डिलिट करत आपल्या फेसबुक प्रोफाइल वरून सर्व मित्रांना अकाउंट हॅक झाल्याचे कळविले असले तरीही सर्वांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. 


यवतमाळ जिल्ह्यातील वणी सह परिसरातील काही जनांसह माझे देखील फेसबुक खाते हॅक झाले होते त्यामुळे मला सुद्धा आर्थिक फटका बसविण्याचा प्रयत्न हॅकर्स कडून झाला असल्याने सावधानता बाळगा खातरजमा केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नका असे अनिल उत्तरवार यांनी टीम खबरकट्टा सोबत बोलताना सांगितले. 

समयसूचकता लक्षात घेता तात्काळ आधुनिक पद्धत व खात्रीशीर संगतीचा परिणाम मला कोणतीही आर्थिक हानी झाली नाही त्यामुळे कोणीही खात्री लायक व्यक्तीचे नांव जरी सांगितले तरी बोलणे केल्याशिवाय कोणताही व्यवहार करू नये असे रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी चे माजी अध्यक्ष अनिल उत्तरवार यांनी बोलून दाखविले. 


🔴 हाथाला काम नसल्याने सुशिक्षित बेरोजगार आर्थिक उलाढालीच्या मागे असावे काय?

हॅकर्स चे प्रमाण वाढते पाहता ज्यांना या सर्व आधुनिक गोष्टीचे ज्ञान अवगत आहे असे हाताला काम नसलेले सुशिक्षित बेरोजगार यामागे लागले असावे काय? कारण इतके शिकून जर हाताला काम नाही तर मग करायचे तरी काय असे तर नाही ना? हे मात्र कोडेच किंवा कमी वेळात ज्यादा नफा असे? की आणखी काही मात्र अशाना आळा बसने गरजेचे झाले आहे.

🔵 तात्काळ बदलावा आपला फेसबुक पासवर्ड .. !

आपल्या फेसबुक अकाउंट वर अश्या प्रकारची समस्या उध्दभवल्यास तात्काळ पासवर्ड बदलणे हीच एकमेव उपायोजना सध्या तरी उपलब्ध आहे. त्यामुळे सतर्क राहा, कोणतेही व्यवहार फेसबुक मॅसेंजर वर आलेल्या मागणीवर करू नका !




🟢  टीम खबरकट्टा तर्फे जाहीर सूचना 

सर्व मित्रांना कळविण्यात येत आहे की जवळपास सर्व फेसबुक अकाउंट हॅकर्सने क्लोनिंग केले जात आहे. ते तुमचे प्रोफाईल फोटो आणि तुमचे नाव नवीन फेसबुक अकाउंट तयार करण्यासाठी वापरत आहेत आणि नंतर तुमच्या मित्रांना त्या अकाउंटमध्ये जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमच्या मित्रांना वाटते की हे तुम्ही आहात आणि ते त्यात सामील होतात. तेव्हापासून ते हॅकर्स तुमच्या नावाखाली जे पाहिजे ते लिहू शकतात!!!

मला तुम्हाला माहीत आहे की माझ्याकडे नवीन फेसबुक खाते उघडण्याचे कारण नाही. कृपया काळजी घ्या आणि माझ्या नावाने नवीन FB अकाउंट वरून येणारी फ्रेंड रिक्वेस्ट अजिबात  स्वीकारू नका!!

पैश्याची मागणी, अश्लील, सांप्रदायिक, जातीवाद किंवा पैसा ट्रान्स्फर या विषयी माझ्या अकाउंट वरून कोणाला मेसेज आला तर तो फेक असेल कारण मला तसे करण्याची गरज नाही.

(हा मेसेज टाईमलाईनवर कॉपी पेस्ट करा, जेणेकरून तुमच्या नावासह केलेल्या अश्या फेक अकाउंटची विनंती तुमच्या मित्रांपैकी कोणीही स्वीकारू शकणार नाही)

सदैव आणि सावध रहा !सतर्क रहा !
धन्यवाद🙏🙏🙏

Pages