🔥 Burning Shop फुटपाथवरील दुकानाला भिषण आग :- आगीत लाखो रुपयांची नुकसान... :- आगीला वेळीच नियंत्रण केल्याने मोठी हाणी टळली.... - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



🔥 Burning Shop फुटपाथवरील दुकानाला भिषण आग :- आगीत लाखो रुपयांची नुकसान... :- आगीला वेळीच नियंत्रण केल्याने मोठी हाणी टळली....

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपूरी:- 


ब्रम्हपूरी-वडसा रोडवरील आय.सी.आय.सी.आय बॅंक समोरील खुल्या जागेत खंडाळा येथील योगेश विनायक कोलते हा योगेश ऑटोमोबाईल दुचाकी दुरुस्ती दुकान मागील अकरा वर्षांपासून तीथ दुकान टाकुन काम करत आहे.यांच्या भरोशावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. काल सायंकाळी रोज प्रमाणे दुकान बंद करून गावी गेला.पण रात्री १०:३० वाजता अचानक पणे दुकानाला आग लागल्याने रस्त्यावरील नागरिकांच्या सर्तकर्ते मुळे वेळीच अग्निशामक दलाला पाचारण करून आगीला नियंत्रण करण्यात आले.

या आगीत योगेश लाखो रुपयांचे नुकसान झाले.योगेश चे दुकान फुटपाथवर असल्याने तीथे विद्युत लाईट नाही.तरी पण आग कशी काय लागली ? हाच प्रश्न पडत आहे.अनेक ग्राहकांच्या दुचाकी वाहन दुरुस्ती साठी आले होते.

अचानक पणे लागलेल्या आगीत सर्व दुकानातील सामुग्री जळुन खाक झाले. या आगीत ग्राहकांच्या दुचाकी वाहन जळुन खाक झाल्याने योगेश विवंचनेत आहे.


ही आग कशी लागली यांच प्रश्न पडत असुन मी अनेक कितेक वर्षांपासून इंथे दुकान सुरू केली आहे.माझ्याकडे इलेक्ट्रिक नसुन तरी सुद्धा ही आग कशी लागली यांची चौकशी करून मला नुकसान भरपाई देण्यात यावी- योगेश विनायक कोलते (दुकान मालक)

Pages