देशात सर्व निवडणुका एकत्र, मोदींनी दिले संकेत #one-nation-one-election - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



देशात सर्व निवडणुका एकत्र, मोदींनी दिले संकेत #one-nation-one-election

Share This

खबरकट्टा / राष्ट्रीय : 

देशाच्या प्रगतीसाठी 'वन नेशन, वन इलेक्शन'ची गरज असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. आज मोदींनी अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या संमेलनाला संबोधित करताना मोदींनी 'वन नेशन, वन इलेक्शन'बद्दल गांभीर्यानं विचारमंथन आवश्यक असल्याचं म्हटलं. 


संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी पीठासीन अधिकाऱ्यांशी संवाद साधला.'वन नेशन, वन इलेक्शन' केवळ विचारमंथनाचा विषय नाही. ही देशाची गरज आहे. आता आपल्याकडे काही महिन्यांनी देशात कुठे ना कुठे निवडणूक होत असतात. त्यामुळे विकासकामांमध्ये अडथळा येतो. देशाच्या प्रगतीचा वेग मंदावतो. 


याबद्दल आपण गांभीर्यानं विचार करायला हवा, असं मत मोदींनी मांडलं. लोकसभा, विधानसभा आणि अन्य निवडणुकांसाठी केवळ एका मतदारयादीचा वापर व्हायला हवा. आपण या मतदारयाद्यांवर पैसा आणि वेळ का खर्च करतोय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Pages