#bike-thief: ब्रम्हपूरी तालुक्यात दुचाकी चोर सक्रिय :- महीण्या भरात अनेक दुचाकी वाहन चोरी. :- पोलिसांच्या समोर मोठे आव्हान.. - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



#bike-thief: ब्रम्हपूरी तालुक्यात दुचाकी चोर सक्रिय :- महीण्या भरात अनेक दुचाकी वाहन चोरी. :- पोलिसांच्या समोर मोठे आव्हान..

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपूरी:- 



ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन अंतर्गत ब्रह्मपुरी तालुक्यातील झिलबोडी येथील रमेश वासुदेव शेंडे हे शेतामध्ये आणि देण्यासाठी गेले असता त्यांनी आपली दुचाकी वाहन गोसीखुर्द कालव्याच्या पारी ठेवून शेताकडे गेले.काही वेळातच परत आले तर दुचाकी तीथुन गायब झाली होती. तेव्हा त्यांनी अनेक ठिकाणी आजुबाजुला शोध घेतला. पण  दुचाकी मिळाली नाही. लगेचच त्यांनी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली व अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.


या महीण्याभरात अनेक ठिकाणांहून दुचाकी वाहन चोरी गेल्याचे बघावयास मिळत आहे.काही दिवसांपूर्वी फटका मार्केट मधुन कुर्झा  व बोडधा येथुन दुचाकी वाहन चोरी गेल्याचे दिसून आले आहे.ब्रम्हपुरी येथील जाणकार नागरिकांन कडून बोलले जात आहे की दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या ची टोळी शहरात सक्रिय झाल्याचे अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.


चोरी गेलेल्या दूचाकीचा शोध ब्रम्हपूरी पोलिस घेत आहेत. पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे हे दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा कसा काय पडदा फाश करतात याकडे ब्रम्हपूरी वासियांचे लक्ष आहे.

Pages