ब्रेकिंग : बल्लारपूर हत्त्या प्रकरणात अल्पवयीन आरोपीस अटक : पेपर मिल स्लज गार्डन बनत चालले नशेचे ठिकाण #ballarpur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



ब्रेकिंग : बल्लारपूर हत्त्या प्रकरणात अल्पवयीन आरोपीस अटक : पेपर मिल स्लज गार्डन बनत चालले नशेचे ठिकाण #ballarpur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर- 


बल्लारपूर पेपर मिल स्लज गार्डन कॉम्प्लेक्समध्ये एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने आपला हत्येचा गुन्हा कबूल केला आहे.

प्राप्त माहिती नुसार  बुधवारी सायंकाळी  चंद्रपूर रोडवरील स्लज गार्डनच्या नागमंदिरजवळ काही युवक बसले होते, येथे झालेल्या किरकोळ वादानंतर अल्पवयीन मुलाने महाराणा प्रताप वॉर्डातील रहिवासी सुनील तिरुपती समलवार यांच्या चेहर्‍यावर व  डोक्याला मारहाण केली. त्याला अर्धा मृत सोडून तो तेथून पळून गेला. पोलिसांनी संशयाच्या आधारे बुधवारी गणपती वार्ड येथील रहिवासी आरोपीला अटक केली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी तीन वाजता अल्पवयीन आरोपीसह त्याचे तीन अन्य साथीदार नागमंदिर संकुलात बसले होते की सुनील तेथे आला आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामुळे संतापल्याने अल्पवयीन आरोपीने मृताच्या चेहऱ्यावर व डोक्याला तीन चार वार केले.


परंतु प्रचलित चर्चेनुसार मृत आणि अल्पवयीन आरोपी आणि त्याचा साथीदार एकमेकांना आधीच ओळखत होते आणि पैशांच्या व्यवहारानंतर झालेल्या वादात खून पुढे येत आहे. घटनेचे ठिकाण हे शहरातील नशा करणाऱ्या युवकांचा अड्डा बनला आहे.  मनाई असूनही दारू आणि गांजासारख्या मादक पदार्थांच्या वापर होत असल्याचे पुरावे या ठिकाणी सापडतात. 


Pages