ओबीसी जम्बो बैठकीचे 20 नोव्हेंबर ला आयोजन #obc - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



ओबीसी जम्बो बैठकीचे 20 नोव्हेंबर ला आयोजन #obc

Share This
🔰 7 डिसेंबर 2020च्या मुंबईच्या अधिवेशनावरील महामोर्चाची दखल घेवुन ओबीसी लढ्यातील महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना मा. मुख्यमंत्र्यांनी पाचारण करून जम्बो बैठकीचे 20 नोव्हेंबर ला आयोजन


🔰विदर्भातून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक मा. डॉ. अशोक जिवतोडे उपस्थित राहणार


🔰मराठा समाजाला ओबिसी प्रवर्गात सहभागी करु नका. व भरती बंदी उठवून एमपीएससी व पोलीस भरती परीक्षा तात्काळ घ्या, याविषयावर चर्चा होणार.



खबरकट्टा / चंद्रपुर : रविकांत वरारकर - 


दि. 7 डीसेंबर 2020 ला मुंबई येथील हीवाळी अधिवेशनावर धडकणा-या ओबीसी समाजाच्या मोर्चाची तातडीने दखल घेवुन राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. उध्दवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना आमंत्रित केले आहे. या बैठकीत राज्याचे ईतर मागास बहुजण कल्याण मंत्री मा. श्री. विजय वडेट्टीवार व इतर ओबीसी मंत्री उपस्थित राहणार आहेत.


सदर बैठकीला राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोंकण, मुंबई व ठाणे, विदर्भ आदी विभागातील मुख्य ओबीसी नेत्यांना उद्या (दि.20 नोव्हे.) रोज शुक्रवारला मुंबई येथे बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. ही बैठक दुपारी 2 ते 5 च्या दरम्यान होत असुन सदर बैठकीत 7 डीसेंबर ला होणा-या ओबीसी समाजाच्या विशाल मोर्चाच्या पार्श्वभुमीवर ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात चर्चा होणार आहे. व ओबीसींच्या अनेक मागण्यांना वाचा फुटनार आहे. 


विशेषत: मराठा समाजाला ओबिसी प्रवर्गात सहभागी करु नका. व भरती बंदी उठवून एमपीएससी व पोलीस भरती परीक्षा तात्काळ घ्या, याविषयावर चर्चा होणार आहे. ओबीसींचा बैकलॉग भरुन काढा व जिल्हावाईज आरक्षण पुर्ववत करा, या व इतर पुर्वापार मागण्या असणार आहेत.

या बैठकीला विदर्भातून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक मा. डॉ. अशोक जिवतोडे उपस्थित राहणार आहेत. यासाठी उद्या (दि.20 नोव्हे.) ला सकाळी यांचे मुंबई कडे सकाळी विमानाने प्रस्थान होणार आहे.

मुख्यमंत्रीद्वारा ओबीसी चळवळीतील नेत्यांना दूस-यांदा बोलावून ओबीसी आंदोलनाची दखल घेण्याची ही आजपर्यंत च्या शासनातील पहिलीच वेळ आहे.

या अगोदर दिनांक 9.10.2020 ला सह्याद्री मुंबई येथे मा उद्धवजी ठाकरे साहेब,मुखमंत्री महाराष्ट्र राज्य, मा विजय भाऊ वडेट्टीवार साहेब, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य, व व्हिडीओ कॉन्फरन्स वर मा. छगन भुजबळ साहेब मंत्री महाराष्ट्र राज्य,यांच्या उपस्थितीत ओबीसींच्या शिष्टमंडळा सोबत बैठक झाली होती.


Pages