माजी तालुकाध्यक्षासह अनेक भाजप कार्यकर्त्यांचा क्रॉग्रेस मध्ये प्रवेश #congress - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

माजी तालुकाध्यक्षासह अनेक भाजप कार्यकर्त्यांचा क्रॉग्रेस मध्ये प्रवेश #congress

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रह्मपुरी:-  

ब्रह्मपुरी तालुक्यांत भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष यांच्या सह अनेक कार्यकर्ते अनेक दिवसांपासून पक्षा अतर्गंत नाराजीचा सूर पहावयास मिळत होते.पण आज अचानक पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भाजपा माजी तालुकाध्यक्ष नानाजी तुपट, माजी शहराध्यक्ष जगदीश तलमले, जितेंद्र ठाकरे उपसरपंच नांदगाव,भुषण भोयर युवा नेते, अविनाश गेरडे गांगलवाडी,लव्हाजी बांडे माजी उपसरपंच नांदगाव, रमेश बावनकुळे कुर्झा, संतोष ढोरे,प्रविण राऊत, सिताराम ढोरे, गोवर्धन डांगे,चुनीलाल राऊत, ओमप्रकाश पिल्लारे, दिलीप ठाकरे,प्रमांनंद बगमारे,धम्मदिप डांगे,पंढरी राऊत,शालिक फंटीग , जागेश्वर राऊत, आदींनी नागपुर येथे कमलबाई निवास येथे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत क्रॉग्रेस मध्ये प्रवेश केला. 

यावेळी  चंद्रपूर ग्रामिण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे,ब्रह्मपुरी तालुका क्रॉग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, डॉ.राजेश कांबळे जि.प.सदस्य, विलास विखार नगरसेवक ब्रम्हपुरी,उत्तम बनकर रूई आदी मान्यवर उपस्थित होते.