राजुरा तलावात बुडून युवकाचा मृत्यू #Youth drowns in tulana lake - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



राजुरा तलावात बुडून युवकाचा मृत्यू #Youth drowns in tulana lake

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

राजुरा तालुक्यातील तुलना येथील 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून वृत्तलिहेस्तव मृतदेह सापडला नव्हता. 


थोडक्यात माहिती नुसार आज दिनांक 19 नोव्हेंबर ला राजुरा तालुक्यापासून 10 किलोमीटर अंतरावर तुलना येथील तलावात आज दुपारी दोन वाजताच्या दरम्यान काही युवक पोहण्यास गेले होते. दरम्यान पोहोताना सेवन ठाकरे नामक युवक खोलात बुडत गेला असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी गावकऱ्यांना दिली. 


गावकऱ्यांनी तात्काळ विरूर पोलीस ठाण्यास माहिती दिली असतात.एएसआय सफदर खान पठाण, जमादार सुनील राऊत, लक्ष्मीकांत खंडाळे, प्रल्हाद जाधव, पोलीस पाटील विनोद खनके गोताखोर दादाजी पचारे,रमेश, तुकाराम मडावी पाण्यात बुडालेल्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. सायंकाळची वेळ असल्याने गोताखोरांना शोध घेण्यास अडचणी येत आहेत. सायंकाळी 7 वाजता बातमी लिहेपर्यंत मृतदेहाचा शोध लागला नव्हता.

Pages