खबरकट्टा :चंद्रपूर : वरोरा
काल (दि.२७) ला स्थानिक धनोजे कुणबी समाज भवन येथे धनोजे कुणबी समाजाचा वधु-वर परिचय मेळावा पार पडला. या मेळाव्यात लोकप्रतिनिधीसह विविध पक्षात कार्यरत राजकीय तथा सामाजिक नेते उपस्थित होते. सोबतच समाजातील जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते. मात्र भारतीय जनता पक्षात समाजाचा नेता म्हणून मिरविणारा एक स्वयंभू नेता मात्र या मेळाव्यातून बाहिस्कृत दिसला. या भाजपाच्या नेत्याला मेळावा आयोजकांनी बोलाविलेच नाही. यातून त्या नेत्याची कुणबी समाजात काय इज्जत आहे हे समजते. समाजातच त्याला प्रतिष्ठेने बोलावीले जात नसेल तर तो भारतीय जनता पार्टी सारख्या राष्ट्रीय पक्षात समाजाचा नेता म्हणून कसाकाय मिरवितो, हा प्रश्नच येथे उभा झाला आहे.
निव्वळ समाजाचा चेहरा म्हणून मिरवायच मात्र समाजासाठी इतक्या वर्षात या नेत्याच काहीच योगदान नाही. समाजाकरीता किंवा समाजातील तरुणांकरीता या नेत्याने आजतागायत काहीच केले नाही. निव्वळ अल्पसंख्याक समाजाची 'जी हुजरेगिरी' करायची, पद घ्यायचे, अर्थकारण करायचे, व केवळ स्वताच्या विकासाकरिता राजकारण करायचे, समाजाला गृहीत पकडायचे, ही एककलमी यांची निती आहे.
आता समाजाच्या राज्य स्तरीय मेळाव्यातच अश्या नेत्याला बोलाविले नसल्याने या नेत्याचे समाजात 'देव' पाण्यात दिसत असून या नेत्याचा 'भोंगळ' चेहरा समोर आला आहे.
स्वत: विधानसभा निवडणूक प्रमुख असताना विधानसभा आमदार होण्याचे डोहाळे या तथाकथित नेत्याला लागले आहे. मात्र समाजच या नेत्याला डावलत असेल तर तर हा नेता कसाकाय आमदार होईल? अशी चर्चा आहे.