खबरकट्टा / चंद्रपूर :
सामाजिक न्याय विभागाने, अनुसूचित जाती / जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी अधिसूचना काढली असून या अधिसूचना मध्ये बरेच बदल केली आहे व ओबीसी (विजा, भज, व विमाप्र ) अनुसूचित जाती / जमाती, इतर समाजाची जातनिहाय जनगणना करण्यासाठी ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूची जमाती, विजा, भज व विमाप्र समजा तर्फे महामोर्चाचे आयोजन केले आहे,7 फेब्रुवारी 2024 ला गांधी चौक येथून संयुक्त बहुजन महामोर्चा चे अयोजन करण्यात आला आहे.
27 डिसेंबर 2023 राजपत्र रद्द करणे व ओबीसी, अनुसूचित जाती / जमाती सोबत इतर समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी तसेंच राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब दिनांक 26 जानेवारी 2024 नुसार मसूदा काढला आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसी सोबतच वर अन्याय करणारा आहे. त्याचबरोबर शिंदे समिती ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारसीवरून कुणबी प्रमाणपत्र देणे हे घटनाबाह्य आहे त्याचा विरोध नोंदविण्याकरिता 7 फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा धडकणार आहे.
या संयुक्त मोर्चाच्या नियोजन कार्यालयाचे उदघाटन काल दिनांक 29 जानेवारी 2024 ला सायंकाळी 6 वाजता डॉ संजय घाटे हॉस्पिटल जवळ, रामाला तलाव रोड येथे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ व संताजी शिक्षण प्रसारक मंडळ जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. वासुदेव गाडेगोणे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम 2000 मध्ये बदल कारणासाठी सरकारने राजपत्र काढले असून त्या मुळे प्रमाणपत्र मिळण्यास बोगसगिरी होण्याचे प्रमाण जास्त होऊ शकते , म्हणून राजपत्र रद्द करून घेण्यासाठी आणि ओबीसी (विजा, भज, विमाप्र ) "अनुसूचित जाती / जमाती व इतर समाजाची जात निहाय जनगणनेच्या मागण्यांवर महामोर्चा निघणार आहे.