वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या बाबाराव मस्की यांच्या वर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याची भाजपा : भाजप कार्यकर्त्यांची गुन्हा दाखल रण्याची मागणी : गुन्हा दाखल
राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्याचे वन मंत्री यांच्या विषयी अपमानास्पद अश्लील शब्दात बाबाराव मस्की नामक व्यक्तीने यांनी 17नोव्हेंबर 2023 रोजी सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसारित करित अनावश्यक भाष्य करित शिविगाळ करित घरा पर्यंत जाऊन जिवेमारण्याची भाषा केली.
शांतता पुर्व स्थितीत सामाजिक व राजकीय स्थिती योग्य राहावी म्हणून बाबाराव मस्की यांच्या विरोधात राजुरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून त्यांच्या वर योग्य कार्यवाही करून गुन्हा व अटक करण्याची मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे वतीने केली आहे.दरम्यान गडचांदूर पोलीस ठाण्यात सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश धोटे कामगार आघाडी मौर्चा जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे, ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सदिप पारखी अनुसूचित जाती मौर्चा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव जिवणे,प्रमोदजी लांडे संजय जयपुरकर,संतोष तेलिवार आदी सह अन्य पदाधिकारी यांनी तक्रार दाखल करित मागणी केली.