राजुरा :- रॉकस्टार संस्थे तर्फे आयोजित प्रियदर्शिनी सभागृह, चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या क्विंस अँड प्रिन्स स्पर्धेत राजुरा शहरातील पेरी बेकरस च्या संचालिका सौ. राधा प्रणय विरमलवार या मिसेस क्वीन ऑफ चंद्रपूर च्या विजेत्या ठरल्या त्याच बरोबर मोस्ट स्टायलिश लूक या अवार्डने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
या यशासाठी त्यांचेवर शहरात सर्वत्र कौतुक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामध्ये सौ. राधा प्रणय विरमलवार यांचे पती श्री. प्रणय विरमलवार यांनी मोलाचे सहकार्य केले.