Heartattack at gym | ERAI-Multifit Gymचंद्रपूर इरई मल्टी-फिट जिममध्ये कसरत करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने एका व्यक्तीचा मृत्यू - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



Heartattack at gym | ERAI-Multifit Gymचंद्रपूर इरई मल्टी-फिट जिममध्ये कसरत करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने एका व्यक्तीचा मृत्यू

Share This


खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर-नागपूर रस्त्यावर असलेल्या इराई मल्टी-फिट नावाच्या जिममध्ये सोमवारी ( 16 सप्टेंबर )रोजी सकाळी 7 च्या सुमारास एका 50 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रोहित जालान असे मृताचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.#eraimultifitgym
रोहित जालान नियमितपणे इराई मल्टीफिट जिममध्ये व्यायामासाठी जात असे. सोमवारी सकाळी तो जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. दरम्यान, जिममध्ये उपस्थित असलेल्या इतर लोकांनी त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.#chandrapur

प्राथमिक तपासानुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील तपास सुरू केला. मात्र या घटनेबद्दल शहरात शोक व्यक्त केला जात आहे.#हार्टअटॅक

जीममध्ये हार्टअटॅकची भीती?

व्यायाम करताना किंवा मैदानी खेळ खेळताना मृत्यू आल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या आहेत.हे असं का होतं किंवा आपण नव्याने एखादी शारीरिक हालचाल किंवा व्यायाम सुरू करणार असू तर काय केलं पाहिजे याची माहिती येथे घेणार आहोत.

कन्नड चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते पुनित राजकुमार यांचाही अशाचप्रकारे मृत्यू झाला होता. 2021साली पुणे जिल्ह्यात जुन्नर येथील बाबू नलावडे यांचा क्रिकेट खेळताना पिचवरच मृत्यू झाला होता.

2018 मध्ये मुंबईत घाटकोपरच्या सोमय्या कॉलेजमध्ये रस्सीखेच स्पर्धा सुरू असताना 22 वर्षीय जिबीन सनीचा अचानक हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर अश्या् अनेक घटना समोर येत आहेत.त्यामुळेच या घटनांकडे गांभीर्यानं पाहाण्याची गरज आहे.

नवी शारीरिक हालचाल सुरू करताना काय काळजी घ्यायची?

एखादी नवी शारीरिक हालचाल किंवा व्यायाम सुरू करताना आपण अचानक वेगानं सुरुवात करू नये. आपल्या हृदयाला सतत रोज काम करावं लागत असतं. त्यामुळे एखादा नवा व्यायाम किंवा कधीच व्यायाम न केलेल्या माणसाने अचानक व्यायाम सुरू करण्याऐवजी एकेक पायरीने त्याची गती आणि तीव्रता वाढवली पाहिजे.

व्यायामशाळेत हृदयविकाराचा झटका येण्याची किंवा अचानक झटका येण्याची काय कारणं आहेत?

जिम मध्ये मृत्यूच्या घटना का घडतात याचा विचार करताना आपण हृदयविकाराच्या झटके अचानक कसे येतात याकडे पाहू.साधारणपणे अशा बाबतीत संबंधित व्यक्तीला हृदयासंबंधी आजाराचा काही जुना त्रास असण्याची शक्यता असते. याची कल्पना आधी आलेली नसण्याची शक्यता असते.नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. महेश घोगरे यांनी खबरकट्टा ला अधिक माहिती दिली.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि योग्य प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन याने आपण सुरुवात करू शकतो. तसेच फक्त या आजारातून सुटका करुन घेण्यासाठी किंवा वजनाचे ध्येय गाठण्यासाठी व्यायाम नसून तो पुढेही रोज करायचा आहे याची कल्पना आपल्या मनाला असली पाहिजे.
याबरोबरच आपण आहारात काही बदल करणार असू तर तोही आहारतज्ज्ञांना विचारुन आपण केलेल्या तपासण्यांचे अहवाल त्यांना दाखवूनच केले पाहिजेत. आपल्या मनात येतील ते बदल आहारात केल्यास त्याचा तोटाच होण्याची शक्यता वाढते.

Pages