राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी भटारकर तर शहर जिल्हाध्यक्षपदी कक्कड यांची नियुक्ती #chandrapur mul - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी भटारकर तर शहर जिल्हाध्यक्षपदी कक्कड यांची नियुक्ती #chandrapur mul

Share This

खबरकट्टा /चंद्रपूर :

प्रदेशाध्यक्षांनी केली नियुक्ती

मूल (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाच्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नितीन भटारकर तर शहर जिल्हाध्यक्षपदी राजीव कक्कड यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी केली असुन, नियुक्तीचे पत्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल पटेल आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते नागपूर येथील पक्षाच्या एका कार्यक्रमात देण्यात आले आहे. जिल्हयात पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे मत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर आणि राजीव कक्कड यांनी यावेळी व्यक्त केले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष ते प्रदेश कार्याध्यक्ष म्हणुन मागील अनेक वर्षापासुन कार्यरत असलेले नितीन भटारकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी अजित पवार गटात प्रवेश घेतला असुन त्यांच्या पक्ष कार्याची दखल घेवुन नितीन भटारकर यांना चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केले तर शहर जिल्हाध्यक्षपदी राजीव कक्कड यांची नियुक्ती केली आहे. नागपूर येथे अजित पवार गटाच्या एका कार्यक्रमात नितीन भटारकर आणि राजीव कक्कड यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल पटेल आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Pages