खबरकट्टा विशेष : देवराव भोंगळे यांना खुले पत्र #bjp - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



खबरकट्टा विशेष : देवराव भोंगळे यांना खुले पत्र #bjp

Share This
भाजप सोशल मीडिया राजुरा तालुका प्रमुख हितेश गाडगे यांनी पहिल्या बातमी नंतर गेल्या दोन दिवसात समाज माध्यम व काही परिचितांना व्यक्तिगत शिवीगाळ करत घातलेल्या धुडगुसाबद्दल वाचकांना माहिती होणे गरजेचे झाल्याने "राजुरा विधानसभा निवडणूक निरीक्षक देवराव भोंगळे यांना टीम खबरकट्टा चे खुले पत्र"

खबरकट्टा / चंद्रपूर : गोमती पाचभाई -27 ऑगस्ट 2023

श्री.देवराव भोंगळे या खुल्या पत्राद्वारे आम्ही आपणास सतर्क करू इच्छितो की आमचे तुमच्याशी कोणतेही वैर नाही,कोणतीही असूया नाही.त्यामुळे तुम्ही आमच्या फाटक्यात पाय घालू नका. तुम्ही जे मोहरे पुढे करून धमकी सत्र सुरू केले आहे ते आम्ही व्यवस्थित जाणतो.आम्ही लेखणीच्या दणक्याने तुमचे गाडगे सहज फोडू शकतो हे ध्यानात ठेवावे!

राजुरा विधानसभा क्षेत्रात उमेदवार म्हणून कोणत्याही पक्षाने पार्सल उमेदवारी लादू नये या स्थानिक मतदारांच्या भावनेतून आम्ही टीम खबरकट्टा विधानसभा क्षेत्रात असलेल्या चारही तालुक्यात भाजप,काँग्रेस, राष्ट्रवादी,शेतकरी संघटना या पक्षांना तुमच्याकडे स्थानिक मर्द नाही का असा सवाल विचारत पार्सल लादू नये ही मोहिम आम्ही 2019 मध्येच सुरू केली होती व ती पुढेही कायम राहीलच! फक्त स्थानिक या मुद्यावरून राजुरा विधानसभा क्षेत्रातील 327 गावांमध्ये जुलै 2024 पर्यंत ही मोहीम आम्ही अधिक तीव्र करावी अशी आमच्या वाचकांनीं, स्थानिक मतदारांनीं अपेक्षा गेल्या 4 वर्षांपासून अनेक मेसेज द्वारे टीम खबरकट्टा ला आठवण करून देत असतात.त्या क्षेत्रातील येणाऱ्या अनेक मेसेज ची प्रत आम्ही प्रिंट स्वरूपात संग्रहित करून ठेवत असताना,अनेक मतदारांच्या भावना लक्षात घेत आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वर्षभराधीच हीं मोहीम हाती घेतली आहे.

आता तुम्ही भारतीय जनता पार्टीचे फक्त निवडणूक निरीक्षक आहात. मात्र विधानसभा प्रमुख (असे कोणतेही अधिकृत पद या पक्षात नाही)असल्याचा आव आणून जे कार्य तुम्ही सुरू केले आहे. त्या माध्यमातून तुम्ही लोकनेते श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची व स्थानिक मतदारांची सुद्धा उघडपणे फसवणूक चालवली आहे. सेवाकेंद्राच्या नावावर सम्पर्क कार्यालय उघडणे (ज्याची मागील निरीक्षक खुशाल बोन्डे यांना कधीच गरज भासली नव्हती )कृत्रिम गर्दी गोळा करणे,शेतकरी संघटना व काँग्रेसचे पदाधिकारी भाजपचे असल्याचे भासवून तुम्ही स्वतःच्या पक्षाची व पर्यायाने सुधीरभाऊंची फसवणूक करत आहात,तुमची ही फसवी कृती आम्हाला जनतेच्या व सन्माननीय सुधीरभाऊंच्या लक्षात आणून द्यायची असल्याने आम्ही फक्त ग्राउंड वस्तुस्थिती वर लिखाण करून स्थानिक मतदारांच्या भावनांचा आदर करण्याचा प्रयत्न केला.

प्रिय सुधीरभाऊ मुनगंटीवार हे जिल्ह्याचे विकासपुरुष आहेत.हे आपला जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्य जाणते. 30 वर्षे प्रचंड परिश्रम करून त्यांनी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा विस्तार केला.चंद्रपूर जिल्ह्यात विकासाची गंगा आणली. अर्थमंत्री पदाच्या काळात अभूतपूर्व असा निधी खेचून आणत त्यांनी जिल्ह्याला प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर केले. पण तुम्ही या सत्पुरुषालाही फसवत आहात. तुम्ही त्यांची जी फसवणूक केली आहे त्याची ठळक उदाहरणे आम्ही इथे देतोय ..

1️⃣. बहुचर्चित नाकोडा येथील आरिफ(हाजी यांचा चुलत भाऊ )हत्याकांडातील भोंगळे-बोन्डे-बांदूरकर यांचा संशयास्पद सहभाग (असे सांगणारा एक व्हिडीओ आमच्या वाचकांनीच परवा पाठवालाय त्या वाचकाचे टीम खबरकट्टा तर्फे आभार!)

2️⃣ फ्रॉड शिक्षक विवेक बोढे यांना पाठीशी घालत शिक्षण क्षेत्राला फासलेला काळिमा,विद्यार्थ्यांचे केलेले नुकसान.

3️⃣ जिल्हा परिषदेत असताना तुमच्यावर निघालेली 4 कोटींची रिकव्हरी.

4️⃣ बल्लारपूर विधानसभेवर डोळा ठेवून पोंभुर्णा तालुक्यात चालविलेली घुसखोरी व त्यातून सौ.संध्या गुरनुले जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांना अडचणीत आणण्यासाठी विनोद अहिरकर यांच्याशी बांधलेले संधान.अहिरकर यांच्याकडून मोबाईल चे गिफ्ट घेऊन विरोधी अहिरकर यांना संध्याताईंच्या विरोधात केलेल्या कार्याचे बक्षीस म्हणून तुम्हाला त्यांच्या तुम्हांला मिळालेली उमेदवारी.

तुम्ही सुधीरभाऊंची जी फसवणूक केली आहे त्याचा पाढा वाचायचा म्हटले तर हे पत्र अपुरे पडेल. पण तूर्तास ही उदाहरणे पुरेशी आहेत.आता तीच फसवणूक तुम्ही राजुरा विधानसभेत अनेक मान्यवारांच्या (काँग्रेस चे एक वरिष्ठ व सास्ती येथील माजी जिल्हा परिषद सदस्या ) यांच्या घरी जाऊन मलाच उमेदवारी घोषित झाली असे स्वतः सांगत फिरत आहात. असो हा तुमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही काही तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीं. आम्ही मानतो ते फक्त एका देवपुरुषाला!

त्या देवपुरुषाची जर कोणी फसवणूक करत असेल तर् आपल्या देवाची भक्ती करण्याचा अधिकार प्रत्येक भक्ताला आहे. राजा बरोबर तुम्ही कार्यकर्त्यांचीही करत असलेली फसवणूक, पाडत असलेल्या फुटी राजू डोहे यांच्या उदाहरणातून स्पष्ट होते. तुम्हीच जिल्हाध्यक्ष असताना 1 जून 2023 रोजी त्यांच्या निलंबनाच्या पत्रावर सही करता व निवडणूक निरीक्षक पद जाहीर होताच निमकर सारखे माजी आमदार व्यक्तिमत्व भविष्यात कॉम्पिटिटर बनू नये म्हणूण छुप्या पद्धतीने डोहे-निमकर यांच्यात वाद विकोपाला नेता. वाह! तुमची पद्धत कार्यकर्त्यांना वापरून घेण्याची व जुन्या स्थानिक नेत्यांना डावलून एका बाणात दोन पक्षी मारण्याची. आता पुन्हा तुम्ही जिल्हाध्यक्ष असताना निर्गमित झाले होते त्याच राजू डोहेला हाताशी धरून सुरू असलेले तुमचे राजकारण सर्वांना माहीत आहे. ते पत्र आजही खबरकट्टा कडे उपलब्ध आहे. (वाचक खालील पत्र डाऊनलोड करू शकतात 👇)

शिवाय आम्ही स्थानिक उमेदवार मागणीतून केलेल्या पार्सल उमेदवारीला विरोधक असलेल्या बातमी नंतर तुमचा पगारी (होय पगारीच,हे आता काही कुणापासून लपून राहिलेले नाहीं) जरी भाजप सोशल मीडिया तालुका संयोजक असलेला हितेश गाडगे याला हाताशी धरून जे धमकी व व्हाट्स अँप ग्रुप्स वर शिवीगाळ सत्र सूरू केले आहे त्याला सडेतोड उत्तरे आम्हालाही देता येतात परंतु, फक्त आमचा मुख्य मुद्दा "राजुरा विधानसभेतील पार्सल उमेदवारी" यावरून लक्ष भटकवून आमच्या स्थानिक वाचकांना नाराज करायचे नसल्याने आम्ही शांत आहोत हे ध्यानात ठेवा!

आणि हो ज्या हितेश गाडगे च्या माध्यमातून तुम्ही तुमचे अधुरे स्वप्न राजुरा विधानसभेत पूर्ण करू बघत आहात तो तुमचा खरा कार्यकर्ता आहे की फक्त पगारी हे आधी तपासून घ्या. नसेल तर् भाजप सोशल मीडिया तालुका संयोजक पदावर राहून सुद्धा 2022 मध्ये झालेल्या विरूर स्टेशन ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी संघटना समर्थीत स्वतंत्र भारत पक्षाच्या पॅनल मध्ये उघडपणे काम करत असल्याचा हा घ्या पुरावा. त्या सोबतच फक्त माननीय सुधीर भाऊंच्या कार्यक्रमावेळी माझा फोटो नाहीं टाकला म्हणून भाऊंचे बॅनर फाडणारा ह्या हितेश गाडगेचा व्हिडीओ म्हणाल तर् देऊ तुम्हाला पाठवून.

खबरकट्टाची पार्सल उमेदवारीला विरोध मोहीम दिवसागणिक अधिक तीव्र होईलच. त्यामुळे हितेश गाडगे कडून आमच्या नातेवाईकांना जाणारे फोन,येणाऱ्या धमक्या यातून तुमच्या पायाखालची जमीन सरकली आहे हे स्पष्ट आहे. शिवाय कोण त्या पवन झबाडे नामक कोणत्या पत्रकाराकडे गोमती पाचभाई वर झालेल्या केसेच ची माहिती त्या पारस पिंपळकर ला सांगा जरा.गोमती पाचभाई यांच्या वर झालेल्या केसेच ची पूर्ण माहिती हवी असल्यास आमचे वकील ऍड. अभय कुल्लूरवार यांचाच नंबर देतो तुम्हाला पाठवून. राहीला विषय गोमती पाचभाई यांच्या शेअर मार्केट व्यवसायाचा, त्याचेच लायसन्स परत मिळताना कुणाचा आशीर्वाद लाभला हे जगजाहीर आहेच. धन्य असो तो स्वामी ज्यांच्या आशीर्वादाने आम्ही आज समर्थ आहोत! जय जय स्वामी समर्थ! 

त्यामुळे, डाव्या हातालाही वेळ पडल्यास उजव्या (राईट) ला कानशिलात लावता येतेच. असं कोणत्याच नियमात नाहीं की हा अधिकार फक्त उजव्याचाच आहे.

यापुढे आमच्या पार्सल मोहिमेचे आणखी गंभीर पडसाद तुम्हाला सहन करावे लागतील.तूर्तास एवढेच.

स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा,नव्हे होईलच...!!!!!

-🌹 गोमती पाचभाई व टीम खबरकट्टा

लवककरच वाचा...गावाकडचे राजकारण पुढील भाग...
2️⃣ चटप परिवाराचे मूसद्दी राजकारण!
3️⃣ काँग्रेस च्या धोटे गटात एकीचे बळ!
4️⃣ गोंडवाना ठरणार निर्णायक!
5️⃣ घुग्गुस ची पार्सल डिलिव्हरी राजुऱ्यात...!

www.khabarkatta.com

Pages