भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे माजी उपाध्यक्ष ( BJYM State Vice President) असलेल्या शिक्षकाचा यांनी राजकारणासाठी वेळ देता यावं, म्हणून या शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ( Teach Students) आपल्या जागेवर चक्क रोजंदार ठेवला होता. हे प्रकरण मागील काही महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेत उघडकीस आले होते.
शिक्षण पवित्र कार्य. शिक्षकांना गुरु म्हटलं जातं. उद्याची भावी शिक्षक घडवीत असतात. मात्र एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासण्याचा प्रकार घुग्घुस येथे घडला आहे. घुग्घुस येथून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत राजकीय पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष असलेला नेता पाच वर्षांपूर्वी या शाळेत शिक्षक पदावर रूजू झाला. मात्र विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कार्य न करता तो पूर्णवेळ राजकारणात सक्रिय राहण्याकरिता कर्तव्यावर न जाता या शिक्षकाने बोगस नियुक्ती अमलात आणली. शहरातील एका बेरोजगार युवकाला स्वतःच्या जागी शिक्षक म्हणून शिकविण्यास नेमून शाळेत शिकविण्यास पाठवत असे.
सदर रोजंदारी शिक्षक शाळेत शिकावीत असतानाचा प्रकार रांगेहाथ उघडकीस आल्यानंतर विध्यार्थ्यांचे पालक वं नागरिकांनी अनेक समाज माध्यमांच्या सहाय्यातून दिवस हा प्रश्न लावून धरला होता तरीही यावर कुणीही रीतसर तक्रार दाखल केली नव्हती व राजकीय अभय देत शिक्षण संस्थेने सुद्धा यावर कोणतीही कारवाही केली नव्हती.
आपल्या जागी रोजंदारी वर शिक्षक नेमणाऱ्या विवेक बोढे यांची तक्रार नेते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी काल विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात उचलला. विवेक बोढे याला कारागृहात घातलं पाहिजे त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी विधानसभेत केली. पवित्र असलेल्या शिक्षकी पेशाला बोढे यांन काळ फासलं. त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं होतं. मात्र तो सत्ताधारी पक्षाततील पदाधिकारी असल्याने त्याच्या बचाव केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी या शिक्षकाचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात उचलून धरल्याने.आता तरी या शिक्षकावर कार्यवाही होईल काय? अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.