सुरजागड लोहखनिज प्रकल्पात मोठी दुर्घटना; उत्खनन करणारं वाहन खाली असलेल्या जीपवर कोसळलं, अभियंत्यासह तिघांचा मृत्यू#surjagad_accident - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सुरजागड लोहखनिज प्रकल्पात मोठी दुर्घटना; उत्खनन करणारं वाहन खाली असलेल्या जीपवर कोसळलं, अभियंत्यासह तिघांचा मृत्यू#surjagad_accident

Share This
खबरकट्टा /गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोह प्रकल्पाच्या खाणीत मोठी दुर्घटना घडली. पहाडीवरुन उत्खनन करणारे वाहन खाली कोसळलं, हे वाहन खाली उभ्या असलेल्या जीपवर आदळलं. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला.Surjagarh Mining Project Gadchioli

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोह प्रकल्पाच्या (Surjagarh Mining Project) खाणीत मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पात रविवारी (6 ऑगस्ट) सायंकाळच्या दरम्यान ही घटना घडली. मृतकांमध्ये सोनल रामगीरवार (वय 26, नागेपल्ली ता. अहेरी) यांच्यासह हरियाणातील दोन मजुरांचा समावेश आहे. हरियाणातील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. या घटनेने एटापल्ली, आलापल्ली, अहेरीत तणाव निर्माण झाला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सुरजागड पहाडीवर लॉयड मेटल्स कंपनीकडून लोह उत्खनन सुरु आहे. या पहाडीवरुन उत्खनन करणारे वाहन खाली कोसळलं, हे वाहन खाली उभ्या असलेल्या जीपवर आदळलं. तिथे उभे असलेले अभियंता सोनल रामगीरवार आणि अन्य दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर तिघांनाही तातडीने अहेरी इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केलं.

वर्षभरपूर्वीच झाला होता विवाह :

या घटनेत मयत झालेले अभियंता सोनल रामगीरवार यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती झाल्यावर धक्का बसला. नातेवाईकांच्या आक्रोशाने वातावरण सुन्न झाले होते.

अपघातानंतर तणाव :

काल सायंकाळच्या वेळी लँड मेटल कंपनीच्या खाणीत ही घटना घडली. या अपघातानंतर लॅयड मेटल कंपनी परिसरात तणाव निर्माण झाला होता. मजुरांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे या पोलिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
वाहनांमुळे रस्ता खराब

एटापल्ली ते आलापल्ली आणि आलापल्ली ते आष्टी हा मार्ग या कच्च्या मालाच्या वाहतुकीमुळे खराब झाला आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच अपघात होत असतात. सुरजागड लोह खनिज प्रकल्पाच्या वाहनांमुळे या मार्गावर अनेकांचे जीव गेलेले आहेत.

त्याविरोधात अनेक आंदोलन करून देखील जिल्हा प्रशासन किंवा राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाच्या उदासिनतेमुळेच अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाला, असा आरोप करत मजुरांनी निदर्शने केली होती.

Pages