विदर्भाचा वाघ ,सर्वसामान्यांचे नेतृत्व ओबीसी नेते अशी ख्याती प्राप्त असलेले राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार यांच्या नावाची राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून आज घोषणा करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही, येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटक्यांची आतिषबाजी, घोषणाबाजी व पेढे भरवून जल्लोष साजरा केला.
राष्ट्रवादी पक्षातील फुटी नंतर राज्याचे विरोधी पक्षनेते पद रिक्त होते. तर महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक आमदार असल्याने विरोधी पक्ष नेते उपाध्ये काँग्रेस पक्षाकडे दिले जाणार असे स्पष्ट होते. याच दरम्यान विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली.
विधान भवनात राज्यातील शेतकरी, कामगार, नोकरदार वर्ग, व सर्व सामान्य जनता यांच्या समस्यांना घेऊन आपल्या आक्रमक शैलीत विदर्भातील ढाण्या वाघ अशी ख्याती प्राप्त काँग्रेस पक्षाचे धडाडी नेतृत्व, राजाचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते, तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार समस्यांना वाचा फोडत सदनात सरकारला धारेवर धरले.
त्यांच्या आक्रमक भूमिकेचे दखल घेत काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आज वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. ही आनंदाची बातमी कळताच ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली. तर शिंदेवाडी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्थानिक शिवाजी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा जयघोष करीत पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी, तथा काँग्रेस पक्षाचे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.