राजुरा 18 ऑगस्ट क्रीडा संचनालय पुणे अंतर्गत चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा तालुका क्रीडा संकुल येथे विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राजुरा तालुका क्रीडा संकुल येथे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करून क्रीडा स्पर्धेची सुरुवात झाली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बादल बेले यांची उपस्थिती होती. तर उद्घाटक म्हणून प्रभाकर साळवे व प्रमुख अतिथी म्हणून तालुका क्रीडा समन्वयक हरिश्चंद्र विरुटकर, भास्कर फरकाडे , अल्पना कवाडे, पल्लवी आदे, भाग्यश्री कोडाली यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र विरुटकर यांनी केले. आभार भास्कर फरकाडे यांनी मानले. यावेळी उपस्थित विध्यार्थीना मार्गदर्शन करताना बादल बेले म्हणाले
विविध खेळांमुळे विध्यार्थीची शारीरिक व बौद्धिक क्षमता वाढते. तसेच विध्यार्थीमधे क्रीडाप्राविण्य असल्यास अतिरिक्त गुण मिळून टक्केवारीत सुद्धा विध्यार्थीना फायदा होऊ शकतो व नोकरी मधेही संधी उपलब्ध होऊ शकते. यावेळी उदघाट्क प्रभाकर साळवे यांनीही विध्यार्थीना मार्गदर्शन केले. तालुका क्रीडा समन्वयक हरिश्चंद्र वीरूटकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करीत खेळाळूवृत्ती जोपसत सर्वांनी विविध स्पर्धा हसतखेळत वातावरनात पार पाडण्याचे आवाहन केले. बुद्धिबळ खेळासाठी वयोगट 14, 17, 19 मुले व मुली यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून शुभम बन्नेवार, आशिष मडावी हे उपस्थित होते. राजुरा तालुक्यातील विविध शाळातील विध्यार्थीनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.