गावाकडचे राजकारण : #फिक्स आमदार : भोंगळे यांचा विजय निश्चित????? #bjp - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



गावाकडचे राजकारण : #फिक्स आमदार : भोंगळे यांचा विजय निश्चित????? #bjp

Share This
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे राजुरा विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक,तथाकथित दादा व राजुऱ्याचे मामा देवराव भोंगळे यांची स्वयंघोषित उमेदवारी सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. काहींच्या दृष्टीने ही घुसखोरी आहे तर काहींच्या मते हे पार्सल प्रकरण आहे. आता हे फिक्स आमदार प्रकरण कसे आहे याकडे एक दृष्टीक्षेप!
खबरकट्टा / गावाकडचे राजकारण : भाग  1️⃣ -24 ऑगस्ट 2023

तर्  वाचकहो देवराव भोंगळे हे फिक्स आमदार कसे ?????
भाजपचे राजुरा तालुका सोशल मिडिया प्रमुख हितेश गाडगे यांनी सोशल मिडियावर 11 व 12 ऑगस्ट ला #फिक्स_आमदार (हॅशटॅग फिक्स आमदार) ही मोहीम राबविली व इथूनच खरं या वादाला तोंड फुटले. मग निवडणुकीच्या वर्षभराआधीच आमदारकीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा कशी ? याची चाचपणी आम्ही करतोय.विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी सारख्या शिस्तबद्ध पक्षात हे उघडपणे घडतं आहे याचे आश्चर्य वाटते. ही चाचपणी करताना राजुरा विधानसभेच्या 2009 ते 2019 पर्यंतच्या पक्षनिहाय मतांच्या आकडेवारी कडे आपण नजर टाकूया...

2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुभाष धोटे यांना 61476 तर स्वतंत्र भारत पक्षाचे संजय धोटे यांना 45389 मते मिळाली. पुढे 2014 मध्ये संजय धोटे यांनी भाजप कडून निवडणूक लढविली .त्यावेळी त्यांना 66223 तर काँग्रेस चे सुभाष धोटे यांना 63945 मते मिळाली.त्यावेळी संजय धोटे यांना शेतकरी संघटनेची साथ मिळाली. ते या निवडणुकीत विजयी झाले. 2019 मध्ये सुभाष धोटे यांना 60228 , संजय धोटे 51051 मते तर वामनराव चटप यांना 57727 मते मिळाली. 2019 मध्ये संजय धोटे यांच्या पराभवासाठी ऐनवेळी तिकीट मागणाऱ्या देवसेनेने केलेले प्रयत्न काँग्रेसच्या पथ्यावर पडले व सुभाष धोटे विजयी झाले. अर्थातच वामनराव चटप यांची भूमिका निर्णायक ठरली असल्याने आगामी निवडणूकीत आता चटप बाजी मारणार आहेत अशीच चर्चा राजुऱ्याच्या मॉर्निंग वॉक ग्रुप पासून वाटेकर च्या पानठेला बैठकी पर्यंत दररोज रंगत आहे.

मागच्या वेळेस कोरपना येथील देवराव यांचे काही पुरुषोत्तम नातेवाईक, जिवती येथील काही नाराज भैया समर्थक,गोंडपीपरी येथील संगमवार या गुंड प्रवृतीच्या खुशगुऱ्यांनी स्वतः च्या स्वार्थासाठी दादांना चण्याच्या झाडावर चढविण्यात कोणतीही कसर ठेवली नव्हती,मग काय 2019 मध्ये यांच्या माध्यमातून ऐन निवडणुकीच्या वेळेवर राजुरा विधानसभा क्षेत्रात धुडगूस घालणे सूरू झाले.कार्यकर्त्यांना प्रलोभने दाखवून फितूर करणे असे सारे राजरोसपणे सुरू होते.2019 मध्ये देवरावाच्या देवलीलांमूळे 9 हजारांचे झालेले भाजपचे नुकसान काँग्रेसचा फायदा करून गेला. मात्र भाजपचे पक्षश्रेष्ठी याकडे दुर्लक्ष करत राहिले व आता तर या तथाकथित पक्षनिष्ठ नेत्याला चक्क विधानसभा निरीक्षक म्हणून बिरुद बहाल केले. आता या श्रेष्ठतम नेत्याला निरीक्षक पदाची कर्तव्ये कदाचित यापूर्वीचे निरीक्षक खुशाल बोन्डे यांनी सांगितली नसावीत.

तर् काय आहेत विधानसभा निरीक्षकांची कर्तव्य याची सविस्तर चर्चा टीम खबरकट्टा ने प्रदेश कार्यकारणीत कार्यरत एका जेष्ठ पदाधिकाऱ्यांशी केली असता पुढील बाबी समोर आल्या...

1️⃣ संबंधित विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटनेची स्थिती काय आहे याची सातत्याने चाचपणी करत राहणे.

2️⃣पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात समन्वयं आहे किंवा नाही हे तपासणे व त्यांच्यात समन्वयं घडवून आणणे.

अशी सर्व कर्तव्ये विसरून निरीक्षक म्हणजेच विधानसभेचा उमेदवार असा साक्षात्कार या नेत्याला झाला व इथेच सारी गल्लत झाली!

याच पार्सल ने बल्लारपूर विधानसभेवर प्रारंभी डोळा ठेवून बघितला पण त्या क्षेत्रात सुधीरभाऊ शिवाय दुसरा समर्थ पर्याय नाही व आपल्याला तिथे कुत्रं देखील विचारणार नाही हे लक्षात आल्या नंतर देवराव चे पाऊल राजुऱ्याकडे वळले. शिवाय ज्या जिल्हा परिषद क्षेत्रात ते निवडून सुरुवातीला तिथेही अशीच कृत्रिम गर्दी दाखवत निवडून आले मात्र त्यानंतर तिथे कधीही न फिरकणे, सिंचन व कृषी यासारख्या मुलभूत प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष केल्याने तेथील जनतेच्या मनात यांच्या बद्दल प्रचंड असंतोष आहे.त्यामुळे आता राजुरा हेच बलस्थान मानून हे पार्सल आता इकडे वळले.

यांची कुख्याती तर इतकी आहे की चंद्रपूरात यांना "गोल्ड प्लेटेड गॅंग" म्हणून ओळखले जाते. तसंही आता जमानाचं गोल्ड प्लेटेड चा असल्यामुळे माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार या खऱ्या सोन्याच्या नावावर देवराव नावाचे हे पितळ चमकू पाहत आहे हे पक्षात सर्वांना ठाऊक आहेच. आजवर कुणबी समाजाच्या नावावर पक्षात स्थान मागत निवडणुकीत विजयी झाले ,त्या कुणबी समाजात देखील यांना कुणी विचारत नाहीं याचा प्रत्यय अनेकांना आहे, त्याशिवाय कुणबी समाजाच्या वासाडे, जिवतोडे, सातपुते, चोखारे, धोटे, पाऊणकर यांच्या यादीत आपल आडनाव हे कधीच बसवू शकले नाहीत.फक्त काय तो "संवाद" साधन्यापुरतेच भिशीत सामील एवढेच कुणबी समाजाच्या लेफ्ट गटातले प्रतिनिधित्व यांनी कमाविले.

घुग्गुस मध्ये कृत्रिम गर्दी जमवून व्हिडीओ व्हायरल करणारे हे तथाकथित घुग्गुस नरेश आता राजुऱ्यात सेवाकेंद्राचे उद्घाटन करण्यासाठी कृत्रिम गर्दीचेही पार्सल सोबत घेऊन आले.मात्र त्यात राजुऱ्यातील एकही प्रतिष्ठित व्यापारी किंवा समजातील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. मंचावर यांचे नातेवाईक असलेले शेतकरी संघटनेचे व काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले यांचे कृत्रिम भाचे कार्यरत होते. या उपरही हाईट म्हणजे कार्यक्रमाचे संचालन तर् चक्क केतन जुनघरे हा काँग्रेस मधून शेतकरी संघटनेत गेलेला व आता युवा विधानसभा प्रमुख पदाचा दावेदार असलेला कार्यकर्ता करीत होता. सेवाकेंद्र थाटताना जो राजकुमार डाखरे समोर समोर होता तो शेतकरी संघटनेचाच...! व आगामी नगर परिषद निवडणुकीत शेतकरी संघटने कडूनच वॉर्ड मेंबर करीता तिकिट मागण्याची तयारी करून बसलेला!

शिवाय ज्यांनी दादा चे मामा असे ट्रान्सफॉर्मेशन केले तो देवराव भोंगळे यांचा चुलत भाचा असलेला सचिन भोयर! भोंगळे जि. प. अध्यक्ष असताना समायोजनाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातुन वासाडे यांच्या शाळेत येनबोडी येथे आणले. त्या सचिन भोयर याने या कृत्रिम भाच्यांचा गट तयार करून मामा चा मामू करण्याची तयारी केली असल्याची चर्चाच फार आहे. आता पुढे या सचिन भोयरचा भविष्यात बोढे नामक दुसरा फ्रॉड शिक्षक तयार होऊ नये म्हणजे त्या विद्यार्थ्यांचे नशीब.

राजुरा निर्वाचण क्षेत्रात देवराव व देवसेनेचे योगदान कोणत ? आता नागरिक असा विचार करतात ! अँड संजय धोटे यांचे वडील 1962 मध्ये सुभाष धोटे यांचे काका काँग्रेसचे उमेदवार विरुध्द लढले व 100 मतानी पडले.अँड संजय धोटे यांचा  शेतकरी आंदोलनात सहभाग होता. वकीलीचे माध्यमातून जिल्हा परिषद उपाध्यक्ष, शिक्षण संस्थाचे कार्याध्यक्ष  संचालक ,भवानी माता देवस्थानच्या अध्यक्ष ईत्यादी माध्यमातून सतत जवळीक असलेला व्यक्ती सोडून देवसेनेच्या फायद्यासाठी देवराव यांना निवडून द्यायचे काय ? असा ही विचार लोक करत आहेत.
या पार्सल ला उमेदवार म्हणून पाठविल्यास आम्ही काय करायचे यावर राजुरा येथील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याने टीम खबरकट्टा च्या अधिकृत वॉट्सअप वर मेसेज करून आपली प्रतिक्रिया कळविली... "हमारे राजस्थान मे राजकुवर(जावई )कितना भी सत्ता के लिये उछल-कुद कर ले, हम उसका मान-खान-पान सब करते है लेकिन सत्ता हमेशा राजकुमार (स्थानिक )के हाथ में हीं सौपते है " अश्या अत्यंत सूचक प्रतिक्रियांमुळे राजुरा विधानसभेत पार्सल नको ही टीम खबरकट्टा ची मोहीम अधिक बळकटीस येत असल्याचा प्रत्यय येतो.

या पार्सल उमेदवाराच्या समर्थनात उतरलेली भाजप पक्षाची जुनी जाणती इना-मिना-डिका जेव्हा भोंगळे पार्सल नसून राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या निमणी-कारवा येथील मूळ असल्याचा प्रचार करीत असल्याने आम्ही पाळताडणी केली असता निमणी-कारवा या बूथ क्रमांक -82 च्या मतदार यादीत इतर भोंगळे नामक मतदार आहेत तरीही यांचे कुणीही पूर्वज आढळून आले नाही उलटपक्षी यांची वंशावळ वणी तालुक्यातील घुग्गुस नजीक बेल्लोरा असून यांच्या वडिलांचे मामेकुळ घुग्गुस येथील असल्याने यांचे आजोबा तेथे स्थायिक झाले असल्याचे कळते.

त्या कार्यक्रमा नंतर देवराव यांच्या समर्थकांनी फिक्स आमदार म्हणून ठेवलेले व्हाट्स अप स्टेटस बरेच काही सांगून जाते. सोबतच भाजप-संजय धोटे यांचेकडे वळलेले आमचे जुने शेतकरी संघटनेचे किमान 20 हजार मतदान परत मिळेल आणि वामनराव चटप निवडून येतील अशी कुजबुज जेव्हा हिच भाचे  मंडळी करतात  तेव्हा फिक्स आमदार भोंगळे ऐवजी चटप आहेत हाच निष्कर्ष अंतिमतः निघतो.

पुढे वाचा :
2️⃣ चटप परिवाराचे मूसद्दी राजकारण!
3️⃣ काँग्रेस च्या धोटे गटात एकीचे बळ!
4️⃣ गोंडवाना ठरणार निर्णायक!
5️⃣ घुग्गुस ची पार्सल डिलिव्हरी राजुऱ्यात...!

www.khabarkatta.com

Pages