समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली आधार महिला केंद्राची भेट*#chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली आधार महिला केंद्राची भेट*#chandrapur

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :पडोली

चंद्रपूर :- येथील सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर येथील बि. एस. डब्लु. प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांनी प्रा. सुभाषजी गिरडे आणि प्रा. किरणकुमार मनुरे यांच्या मार्गदर्शनात शहरातील सरस्वती शिक्षण महिला मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित आधार महिला केंद्र इंदिरानगर चंद्रपूर येथे संस्थेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या महिला केंद्राची माहिती घेतली.

कौटुंबिक हिंसाचार, सामाजिक हिंसाचार, महिलांवरील होणाऱ्या अन्याय अत्याचार, महिला सबलीकरण, बाल संगोपन, अशा विविध प्रश्नांनी ग्रस्त असलेल्या महिलांना आधार महिला केंद्राच्या माध्यमातून मानसिक आधार देण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून आधार महिला केंद्राचे माध्यमातून सातत्याने केल्या जात आहे. त्या संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनी आज संस्थेला भेट देऊन संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती घेतली.

याप्रसंगी संस्थेचे घनश्याम कामटकर, क्षीरसागर सर, शारदा वाघमारे, प्रियंका वाघमारे, तथा सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा. सुभाष गिरडे, प्रा. किरणकुमार मनुरे यांच्यासह महाविद्यालयाचे बि. एस. डब्लु. प्रथम सत्राचे विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बी. एस. डब्ल्यू. समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी संकेत कुळमेथे यांनी महाविद्यालयाच्या वतीने सरस्वती शिक्षण महिला मंडळ चंद्रपूर या संस्थेच्या माध्यमातून चालत असलेल्या आधार महिला केंद्राच्या कामाचे कौतुक करत आभार मानले.

Pages