कांग्रेस आणी भाजपाच्या वादात, आरोग्य केंद्राचे बांधकाम वांदयात ; आरोप#chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



कांग्रेस आणी भाजपाच्या वादात, आरोग्य केंद्राचे बांधकाम वांदयात ; आरोप#chandrapur

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : घुग्घुस

चंद्रपूर :- घुग्घुस शहराची लोकसंख्या जवळपास ५० हजारावर आहे व घुग्घुस लगत नायगाव, शेनगाव, बेलसनी, म्हातारदेवी, मुरसा, उसगाव, पांढरकवडा इत्यादी गावातील नागरिक यांची लोकसंख्या जवळपास इतकीच आहे, या सर्व नागरिकांचा आरोग्याच्या भार एकट्या घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे नागरिकांकडून सतत नवीन मोठा दवाखाना च्या मागणीवर कांग्रेसचे पालकमंत्री असताना मंजुरी देण्यात आली, भूमिपूजन करून बांधकाम सूरू झाले त्यानंतर २ वर्षांनी भाजपाचे पालकमंत्री जिल्ह्याला लाभले पण ३ ते ४ वर्ष ओलांडून सुद्धा अजूनही बांधकाम अपूर्णचं आहे.

या घटनेची दखल घेत दवाखान्याचा बांधकाम करीत असलेल्या कंत्राटदाराला आम आदमी पार्टी कडून संपर्क केले असता असे कळाले की त्या कंत्राटदाराचा अजूनही बांधकामाची रक्कम सरकार कडून देण्यात आलेली नाही साधारणतः ४ ते ५ कोटी रक्कम थकबाकी आहे म्हणून बांधकाम थांबून असल्याचे समजले, या सर्व बाबीत मात्र नागरिकांची कोंडी होत आहे. जनसामान्यांना औषधोपचारापासून वंचित राहावे लागत आहे कारण एकच इतका भार सध्याचे प्राथमिक केंद्राच्या मर्या देबाहेर आहे.

यावर आम आदमी पार्टी सध्याचे पालकमंत्री आणि शासन, प्रशासनेला निवेदन करते की तात्काळ या विषयावर गांभीर्याने लक्ष देऊन बांधकाम पूर्ण करून हा नवीन दवाखाना जनसेवेसाठी सुरू करावा अन्यथा आम आदमी पार्टी येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारे यावेळी आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे, युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, घुग्घुस शहर अध्यक्ष अमित बोरकर आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Pages