खबरकट्टा/चंद्रपूर:
अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढली असून सकाळपासून 803 घनमीटर प्रतिसेकंद इतका येवा धरणात येत असल्याने धरणाचे दरवाजे दुपारी 3 वाजता उघडण्यात येणार आहे, त्यामुळे वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.#khabarkatta chandrapur
अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 93 मिमी पाऊस झाला आहे. धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. दुपारी ३ वाजेपासून धरणातून 300 घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग सोडण्यात येणार आहे. प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.#khabarkatta chandrapur
अप्पर वर्धा धरणात सकाळी 7 वाजेपर्यंत 370 दशलक्ष घनमीटर म्हणजे 65.64 टक्के जलसाठा झाला होता. आता धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.