मणिपूर घटनेचा सिंदेवाही काँग्रेस तर्फे निषेध...#Sindewahi Congress opposes Manipur incident - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



मणिपूर घटनेचा सिंदेवाही काँग्रेस तर्फे निषेध...#Sindewahi Congress opposes Manipur incident

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

मणिपूर येथे महिलांची नग्न धिंड काढून अत्याचार करण्यात आल्याची चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सर्वत्र आंदोलन सुरू असून आज मंगळवारी सिंदेवाही तालुका काँग्रेस कमिटी तथा महिला काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने मणिपूर घटनेचा निषेधार्थ तहसीलदार सिंदेवाही यांच्या मार्फत देशाच्या महामहीम राष्ट्रपती निवेदन देण्यात आले.#khabarkatta chandrapur

मणिपूर घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहे. याच घटनेच्या निषेधार्थ तालुका काँग्रेस कमिटी सिंदेवाही तथा महिला काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने तीव्र शब्दात संताप व्यक्त करीत सिंदेवाही तहसीलदार शिंदे यांच्यामार्फत देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपतीजी मुर्म यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रमाकांत लोंधे, महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष सीमा सहारे, सिंदेवाही लोनवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, उपनगराध्यक्ष मयूर सूचक,शहराध्यक्ष प्रीती सागरे, नगरसेवक युनूस शेख, अमृत मडावी, विलास रामटेके ,कृउबा संचालक नरेंद्र भैसारे,अभिजीत मुपिडवार, अभिमन्यू गेडाम, जनसंपर्क कार्यालय प्रसिद्धीप्रमुख अशोक सहारे कार्यालय प्रमुख मोरेश्वर ज्ञानवाडकर, माजी नगराध्यक्ष आशा गंडाते, नगरसेविका वैशाली पुपरेड्डीवार, पूजा रामटेके, श्वेता मोहूर्ले,अंजू भैसारे, मीनाक्षी मेश्राम, नीता रणदिवे,कृउबा संचालिका जयश्री नागपुरे, (कावळे) विशाखा उंदीरवाडे, निमंत्रिका कोकोडे , कल्पना मरसकोल्हे ,पुष्पा सिडाम, संगीता शंकपाल, गीता सलामे, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.#khabarkatta chandrapur

Pages