खबरकट्टा/चंद्रपूर:
उसेगांव हे सात सदस्यीय ग्राम पंचायत आहे .अनेक पुरस्कार प्राप्त आहे . येथील तंटामुक्त समिती निव्वळ नावापुरतीच ठरत आहे .येथे मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूची विक्री सुरू आहे तरी जाणुन - बुजुन दुर्लक्ष करीत आहे . येथील अनेक कुटुंबे या अवैध देशी दारूच्या विक्रीमुळे बरबाद झाले आहेत . अनेक महिला सुध्दा या अवैध देशी दारूच्या विक्रीमुळे ञासलेल्या आहेत .हे दारूवीक्रेते घरूनच जशी परवान्याची दुकान लागली अशाप्रकारेच खुलेआम दारूची वीक्री करीत असतात .अनेक वेळा या अट्टल देशी दारू वीक्रेत्याना पोलीसांनी पकडले पण अजुनही उसेगांव मध्ये अवैध रीत्या दारूची विक्री या पुरस्कार प्राप्त गावात सुरू आहे .
या वीक्रेत्याच्या घराजवळील कुटुंबे या दारूवीक्रीमुळे मुले सुध्दा वाम मार्गाला लागलेले आहेत . त्यामुळे उसेगांव येथील महीलांनी पुढे पाऊल टाकुन या अवैध देशी दारू वीक्रेत्या विरोधात एल्गार पुकारावा अशी मागणी महिलांकडून होत आहे.#khabarkatta chandrapur