सिंदेवाही व सावली ग्रामीण रुग्णालयासाठी 76 कोटींचा निधी मंजूर...#76 crores sanctioned for Sindewahi and Sawli rural hospital - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सिंदेवाही व सावली ग्रामीण रुग्णालयासाठी 76 कोटींचा निधी मंजूर...#76 crores sanctioned for Sindewahi and Sawli rural hospital

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:


ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही व सावली तालुक्यातील ग्रामीण नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा ब्रम्हपुरी क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार यांनी पावसाळी अधिवेशनात सिंदेवाही व सावली येथील ग्रामीण रुग्णालयात आयसीयू बेड सह इतर मूलभूत तसेच अद्यावत आरोग्य सेवा मिळावी या उदांत हेतूने सभागृहात मागणी रेटून धरल्याने अखेर आरोग्य प्रशासनाकडून वरील दोन्ही तालुक्याकरिता 76 कोटींचा निधी मंजूर झाला असून माजी मंत्री आमदार वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.#khabarkatta chandrapur

जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असे मानून राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक थारा देणारे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी जनसामान्यांच्या वेदना जाणत कर्करोगाचे महागडी उपचार व जीवित हानी ही गंभीर बाब लक्षात घेत मतदार संघासह जिल्ह्या करिता नुकतीच स्वखर्चातून मोफत कर्करोग निदान अद्यावत वाहनाचे लोकार्पण केले. राज्यातील या पहिल्या प्रयोगाचे संपूर्ण राज्यभरात कौतुक होत असून जिल्ह्यात यशस्वीरित्या कर्करोग निदानाची शिबिरे सुरू आहे.

अशातच ब्रह्मपुरी मतदार संघातील जिल्हा रुग्णसेवे पासून दूर अंतरावर असलेल्या सिंदेवाही व सावली तालुक्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी व अति संवेदनशील स्थितीत नागरिकांना अद्यावत सेवा देऊन त्यांचे प्राण वाचविण्याकरिता महत्त्वपूर्ण असलेल्या अतिदक्षता विभागासह इतर मूलभूत व अद्यावत सेवा पुरविण्याकरिता सध्या राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सिंदेवाही व सावली येथील ग्रामीण रुग्णालयाकरिता 76 कोटींचा विकास निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी सभागृहात रेटून धरली.#khabarkatta chandrapur

यावर अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 76 कोटींच्या विकास निधीला मंजुरी देण्यात आली. माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याने सिंदेवाही व सावली या तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट होणार असून नागरिकांना आगामी काळात पुरविण्यात येणाऱ्या उत्तम आरोग्य सेवेचा लाभ होणार आहे.


Pages