खबरकट्टा/चंद्रपूर:
राज्य शासनाच्या सेवेतील श्री.मंगेश खवले यांची चंद्रपूर महानगरपालिका उपायुक्तपदी नेमणुक करण्यात आली असुन 14 जुलै रोजी मनपा आयुक्त श्री.विपीन पालीवाल यांच्या हस्ते त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला.राज्य शासनाच्या सेवेतून प्रतिनियुक्तीद्वारे त्यांची नेमणुक करण्यात आली असुन याआधी ते उमरेड नगर परिषद येथे मुख्याधिकारी म्हणुन कार्यरत होते.
चंद्रपूर मनपात उपायुक्त पदाच्या 2 जागा आहेत,एका उपायुक्तपदी अशोक गराटे आधीपासूनच कार्यरत असुन दुसऱ्या जागेवर श्री.मंगेश खवले यांची प्रतिनियुक्तीद्वारे नेमणुक करण्यात आली आहे. रुजू होतांना आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच सर्व विभाग प्रमुखांनी उपायुक्त यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.#khabarkatta chandrapur
यावेळी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे, उपअभियंता अनिल घुमडे, उपअभियंता रविंद्र हजारे, डॉ.अमोल शेळके, आस्थापना विभाग प्रमुख अनिल बाकरवाले, संगणक विभाग प्रमुख अमुल भुते यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.#khabarkatta chandrapur