खबरकट्टा/चंद्रपूर:
दोन दिवसांपूर्वी पूर परिस्थितीच्या उपाययोजनेबाबत ऑनफिल्ड असणारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शनिवारी भर पावसात धानाच्या शेतात हजेरी लावली. यावेळी त्यांच्या हस्ते 'श्री' पद्धतीने भात रोवणीचा शुभारंभ करण्यात आला.#khabarkatta chandrapur
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यात येत असलेल्या बोरगांव येथील सुरेश भसारकर यांच्या भात खाचरात एस.आर. आय. (श्री) पध्द्तीने भात रोवणीचा शुभारंभ केला. भाताची लागवड रोपे तयार असून पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी भात लागवड वेग धरत आहे. जिल्हाधिकारी यांनी स्वतः भात खाचरात शेतकरी, लागवड करणाऱ्या महिला यांच्याशी संवाद साधत भात रोवणी केली.#khabarkatta chandrapur
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपजिल्हाधिकारी स्नेहल रहाटे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नागदेवते, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, तहसीलदार शुभम बहाकर, उपविभागीय कृषी अधिकारी, गिरीश कुलकर्णी तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे तसेच क्षेत्रिय कर्मचारी उपस्थित होते.#khabarkatta chandrapur