अवैध उत्खनन व गौणखनिज वाहतुकीबाबत जिल्हा प्रशासन कारवाईच्या मार्गावर...#District administration on course of action regarding illegal mining and transport of minor minerals - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



अवैध उत्खनन व गौणखनिज वाहतुकीबाबत जिल्हा प्रशासन कारवाईच्या मार्गावर...#District administration on course of action regarding illegal mining and transport of minor minerals

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:


जिल्ह्यातील रेती व खनिजांचे अवैध उत्खननास प्रतिबंध करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. जानेवारी ते जून या साडेसहा महिण्यांत तब्बल 65 कारवाया करण्यात आल्या असून 11 लक्ष 24 हजाराचा मुद्देमालासह 46 ट्रॅक्टर, 27हायवा आणि दोन जेसीबीचा जप्त करण्यात आल्या आहे. या कारवायांमध्ये आतापर्यंत 141 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नुकतीच जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षेतेखाली घेण्यात आली. यावेळी खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्यास खनिकर्म विभागाने पोलिस आणि उप-प्रादेशिक परिवहन विभागाला सोबत घेऊन अचानक तपासणी करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी गौडा यांनी दिले आहे. वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक जितेंद्र रामगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार, जिल्हा खनीकर्म अधिकारी सुरेश नैताम, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, पोलिस निरीक्षक महेश कोंडावार आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून खनीज वाहतूक केली जाते. खनिजाची वाहतूक करतांना ट्रांझिंट पासची आवश्यकता असते. मात्र वेकोली करीता हा अपवाद असला तरी वाहतुकीसाठी त्यांचा रोड मायनिंग प्लान असतो. अवैध वाहतुकीबाबत खनीकर्म विभाग, पोलिस विभाग आणि उप-प्रादेशिक विभागाने अचानक तपासणी करावी. तसेच खनीजाचा कोणताही साठा आणि डीलरशीपसाठी नोंदणी आवश्यक आहे. अवैध वाहतूक वेगळ्या मार्गाने होत आहे का आणि अधिकृत मार्गाने होणाऱ्या वाहतुकीची वजनमर्यादा किती आहे, ते तपासावे. वनविभागाच्या खुल्या जागेवर अवैध खनीज साठा आढळल्यास त्याची वनविभागाने तपासणी करावी. जिल्ह्यात अवैध खनीज उत्खनन व अवैध वाहतुकीवर प्रतिबंध करण्यासाठी संबंधित विभागाने गांभिर्याने कारवाया करण्याचा धडाका सुरू केला आहे.#khabarkatta chandrapur

जानेवारी ते जून 2823 अखेरपर्यंत पोलिस विभागाने 65 कारवाया केल्या असून 11 लक्ष 24 हजार 500 रुपयांचा माल जप्त केला आहे. यात 46 ट्रॅक्टर, 27 हायवा आणि दोन जेसीबीचा समावेश आहे. तसेच या कारवायांमध्ये आतापर्यंत 141 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर उप-प्रादेशिक परिवहन विभागाने ओव्हर लोड गौण खनीज वाहतुक संदर्भात 1 एप्रिल ते जून 2023 अखेरपर्यंत एकूण 25 वाहनांची तपासणी केली. यात 2 लक्ष 67 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून सात जण दोषी आढळल्याची माहिती उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी दिली.#khabarkatta chandrapur


Pages