LCB : वाहन चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या अटकेत : Bike Theft arrest - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



LCB : वाहन चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या अटकेत : Bike Theft arrest

Share This
खबरकट्टा / चंद्रपुर :-

जिल्हयामध्ये होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याकरिता Crime पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला LCB Chandrapurविशेष निर्देश दिले होते वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक महेश कोडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना त्याबाबत निर्देश दिले होते.

पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचा मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे पथक हे मोसा चोरीचे रेकॉर्डवरिल गुन्हेगार शोध मोहीम पेट्रोलिंग राबवीत असतांना एड्लॅब्स टॉकीज (कॉरनिवल सिनेमा टॉकिज ) जवळील पुलिया खाली व हेरीटेज ॲपारटमेंट पॉकीग येथे जावुन सापळा रचून गोदींया जिल्हयातील आरोपी रिशीराज ज्ञानेश्वर परशुरामकर वय 24 वर्ष व धम्मदीप संजय मेश्राम वय 21 दोन्ही रा. खाडीपार ता. सडक अर्जुनी जि. गोंदीया यांना ताब्यात घेवुन त्याचे कडुन एक लाल रंगाची सुजकी ऐसेस मोपेड गाडी क्र.एम 34 झेड-8890, एक काळया रंगाची व निळया व लाल पटटे असलेले स्पेलडर मोसा. गाडी कं MH 34 X 0129 आणि एक काळया सिल्वर रंगाची हिरो एच एफ डिलक्स गाडी क्र. MH 29 BU 5779 अश्या तीन मोटरसायकल सह एकूण 100000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पो.स्टे. दुर्गापुर, भद्रावती, वणी जि.यवतमाळ येथील दाखल असलेले मोसा चोरीचे गुन्हे उघडकीस करण्यात आले.

सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि जितेंद्र बोबडे, नागेशकुमार चतरकर, पो.उप.नि. विनाद भुरले पो.हवा. संजय आतकुलवार, धनराज करकाडे, स्वामी चालेकर नापोकॉ संतोष येलपुलवार, चंदु नागरे, अजय बागेसर व पो.अ. नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, प्रशांत नागोसे यांनी केली.

Pages