दिनांक 27/07/2023 रोजी 10 वाजता इरई धरणाचे 2 दरवाजे 25 से.मी. ने. उघडले आहेत. त्यामुळे धरणाचे पाणी हडस्ती तालुका बल्लारपुर या गावापर्यंत पोहण्याकरीता अंदाजे काही तास लागतील. सद्यस्थितीत वर्धा नदीला मोठया प्रमाणात पाणी असल्यामुळे इरई नदी काठावरील गावातील परिस्थिती उदभवण्याची शक्यता आहे.
नदीकाठावरील वढोली, पायली भटाळी, किटाळी, अंभोरा, लखमापुर, खैरगाव, चंद्रपुर शहरातील हवेली गार्डन, सिस्टर कॉलनी, रहेमत नगर, ओंकार नगर, महसुल नगीना बाग, बिनबा गेट, विठोबा खिडकी, पठाणपुरा, आरवट चोराळा, दाताळा, जुनी पडोली, गुरु माऊली नगर, झरपट नदी लगतच्या वस्तीतील नागरीकांना तालुका चंद्रपूर तालुका प्रशासनाद्वारे सतर्कतेच इशारा देण्यात येत आहे.