मतिमंद मुलीचे हातपाय बांधून बलात्कार #jivti - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



मतिमंद मुलीचे हातपाय बांधून बलात्कार #jivti

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :जिवती 

मणिपूर येथील संवेदनशिल घटनेविषयी आक्रोश व्यक्त होत असतानाच आता चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील उप पोलिस स्टेशन पिट्टीगुडाच्या हद्दीतील आंबेझरी येथे कोलाम जमातीच्या १९ वर्षीय मतिमंद मुलींचे हातपाय बांधून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी शरफोदीन शबीर शेख (४४) याला तात्काळ अटक केली असून बलात्कारासह अनुसूचित जाती, जमाती अत्याचार संरक्षण अधिनियम १९८९ सुधारणा २०१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत मुलगी मतिमंद आहे. ती घरात एकटीच असल्याची संधी साधून आरोपी शरफोदीन शबीर शेख याने पिडीतेचे घर गाठले. पिडीत मतिमंद असल्याचा फायदा घेऊन आरोपींने पिडीत मुलीचे दोन्ही हातपाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.

पिडीतेच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती होताच त्यांनी लगेच पिटीगुड्डा पोलिस स्टेशन गाठत घटनेची तक्रार दाखल केली. पिट्टीगुडा पोलिसांनी रात्री उशिरा आरोपी विरुद्ध कलम गुन्हा दाखल करून आरोपी ला अटक केली.

Pages