राजुरा: रामपूर ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीला राजुरा नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केला जीत आहे. यासंबंधी विविध संघटना व नागरिकांनी निवेदने सादर केली आहेत. त्यानंतर मागणीनुसार सरपंच वंदना नामदेवराव गौरकार यांनी या विषयावर मासिक सभा आयोजित केला. या सभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला होता. याच विषयावर मंगळवारी (ता. 11) आयोजित विशेष ग्रामसभेतसुद्धा तब्बल 378 नागरिकांनी उपस्थिती दर्शवित एकमताने ठराव मंजूर केला.#khabarkatta chandrapur
रामपूर ग्रामपंचायत राजुरा नगरपरिषदेला लागून आहे. गावात रहिवासी वापरासाठी विस्तीर्ण क्षेत्र असल्यामुळे या ग्रामपंचायत क्षेत्रात 60 ते 65 अकृषक ले - आऊट आहेत. या ले- आऊटमध्ये मूलभूत नागरी सोयीसुविधा नसल्यामुळे समस्यांचा डोंगर उभा आहे. गावात नाली, रस्ते, वीज यासह अन्य समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.ग्रामपंचायतीच्या अल्प निधीमधून विस्तारलेल्या वस्तीचा विकास करणे
शक्य नसल्याने ही ग्रामपंचायत राजुरा नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी सरपंच वंदना गौरकार यांच्यासह नागरिकांनी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्याकडे ग्रामपंचायत स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केली. त्यानंतर माजी आमदार निमकर यांनी रामपूर ग्रामपंचायत ही राजुरा नगर परिषदमध्ये समाविष्ट करण्याचीमागणी मंचावर उपस्थित पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. ग्रामपंचायत व ग्रामसभेने ठराव मंजूर करून दिल्यास ही ग्रामपंचायत राजुरा नगरपरिषदेमध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही केली जाईल. यासाठी पुढाकार घेणार असल्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी आश्वासन दिले होते.
या ग्रामपंचायतीचा समावेश नगरपरिषदेमध्ये केल्यास राजुरा नगरपरिषदेच्या उत्पन्नातसुद्धा मोठी वाढ होणार आहे. यासंबंधाने माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या पुढाकारात ५ जुलै रोजी सरपंच वंदना गौरकार, माजी उपसरपंच हेमलता ताकसांडे, मारोतराव कायलींगे, नामदेवराव गौरकार यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून ही ग्रामपंचायत न समाविष्ट करण्यात यावी, असे निवेदन सादर केले. त्यानंतर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पुढील कार्यवाही करण्यासाठी र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीने पत्र लिहून रामपूर ग्रामपंचायतीचा समावेश राजुरा नगर परिषदेमध्ये करण्याची मागणी केली.