ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाने केली कंत्राटदारास तुंबळ मारहाण : संदीप गिऱ्हे सह तिघांना अटक आणि जामीन #sandip-girhe-get-arrested - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाने केली कंत्राटदारास तुंबळ मारहाण : संदीप गिऱ्हे सह तिघांना अटक आणि जामीन #sandip-girhe-get-arrested

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, गणेश ठाकूर व मोनित बेले या तिघांनी वरोरा नाका चौकातील साई हेरिटेज येथे रविवारी सायंकाळी धक्काबुक्की करून मारहाण केली.याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तिघांना अटक करून चारचाकी वाहन जप्त केले. न्यायालयाने तिघांचीही जामिनावर सुटका केली आहे.

सविस्तर माहिती नुसार कंत्राटदार जितू चावला हे रेतीचा व्यवसाय करतात. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी वरोरा नाका चौकातील साई हेरिटेज येथे त्यांना भेट घेण्यास बोलविले होते,चंद्रपूर शहरात विविध बांधकाम कामे करीत असलेल्या चावला यांना 'तुम्ही कमी दरात रेती का टाकता,' असा प्रश्न केला.

रेती तस्करीचे काम काही पक्षांच्या युवा राजकीय पदाधिकाऱ्यांकडून चंद्रपूर शहर व लागतच्या परिसरात जोमाने सूरू असून त्यांच्याकरवी इतर व्यवसायिकांना आमच्या भावानुसारच रेती टाकावी असा दबाव टाकण्यात येतो.

अश्याच प्रकरणात संदिप गिऱ्हे, गणेश ठाकूर व मोनित व कंत्राटदार जितू चावला या चौघांमध्ये वाद झाला. गिऱ्हे, ठाकूर, बेले या तिघांनी चावला यांना धक्काबुक्की करीत जबरदस्त मारहाण केली. त्यानंतर ते निघून गेले.

रक्तबंबाळ झालेल्या चावला यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांनाही सोमवारी अटक केली. न्यायालयाने तिघांचीही जामिनावर सुटका केली आहे. पुढील तपास सुरू आहे. मात्र जिल्हाप्रमुखाच्या वजनाखाली गिऱ्हे यांची गुंडागर्दी हा नेहमीचाच विषय पुन्हा चर्चेत आहे.

Pages