आ.सुभाष धोटे काँग्रेस ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष : ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून पुन्हा नवा वाद सूरू #CONGRESS - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



आ.सुभाष धोटे काँग्रेस ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष : ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून पुन्हा नवा वाद सूरू #CONGRESS

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष्यांचा वाद निवळला असून 13 जुलै ला कांग्रेसचे राष्ट्रीय सचिव के सी वेणूगोपाल यांनी चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाबाबत प्रेस रिलीज जाहीर केली आहे.या पात्रात आमदार सुभाष धोटे यांची चंद्रपूर कांग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याचे नमूद आहे.


जिल्हा काँग्रेस कमेटीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून मागील काही दिवसात असलेला संभ्रम दूर झाला असला तरी मात्र या नियुक्तीनंतर आता ग्रामीण जिल्हाध्यक्ष या पदावरून नवा वाद समोर येण्याची चर्चा काँग्रेस च्या सर्व गटात आहे.


सुभाष धोटे यांचे पुतणे शंतनू धोटे हे युवक काँग्रेस चे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असल्याने एकाच घरात काँग्रेस च्या महत्वाच्या दोन कमिट्याची जिल्हाध्यक्ष पदे नियुक्त झाल्याची ही पहिलीच वेळ असावी. याकडे काँग्रेस च्या अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सूरू आढळते.


Pages