गडचांदुर नगरपरिषदेच्या झोलाझंडी कारभारामुळे नागरीक त्रस्त...#Citizens are suffering due to the chaotic management of Gadchandur Municipal Council - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



गडचांदुर नगरपरिषदेच्या झोलाझंडी कारभारामुळे नागरीक त्रस्त...#Citizens are suffering due to the chaotic management of Gadchandur Municipal Council

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

गडचांदुर - नादुरुस्त रस्ते आणि अपघात हे नेहमीचेच समीकरण आहे. उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघात होतो. नागरिकांचा नाहक बळी जातो. तरीही प्रशासन ढिम्म असते. आता तर पावसाला सुरुवात झाली आहे ,रस्त्यावरून जात असताना रस्त्यात खड्डा आहे,की खड्ड्यात रस्ता हेच लोकांना समजत नाही. या प्रशासनाला वारंवार तक्रारी देवून देखील त्याची दखल घेतली जात नाही, आठवडी बाजारातील तसेच शहराती मुख्य रस्त्याची चाळण झाली असून मोठ - मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारक,शेतकरी,विद्यार्थी,महिला यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.#khabarkatta chandrapur

नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाईपलाईनच्या कामांमध्ये जेसीबीने खोदून त्यामध्ये पाईप टाकला आहे परंतु काढलेली नाली योग्य रीतीने न बुजवल्याने सिमेंट काँक्रीट चा रस्ता चिखलमय झाला आहे.अचानक मंदिर समोरून ते छत्रपति शिवाजी महाराज चौक ते राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक पर्यन्त व तिथून महात्मा गांधी शाळेसमोरून पूर्ण रस्ते खडेमय झाले आहेत. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने सर्व सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा निवेदने देवून ही दखल घेतली जात नसल्याने गावकऱ्यातून नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.#khabarkatta chandrapur

रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता हेच लोकांना समजेना गेले आहे. प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरावस्थे संबंधी वारंवार निवेदने /पत्रके देवून ही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने शहरवासीयांचा आक्रोश वाढत आहे. शहराची पारख शहरातील रस्त्यांमुळे केली जाते जर शहरातील रस्तेच खड्डेमय झाले आहेत त्यामूळे शहरवासीयांना अपरिमित शारीरिक,मानसिक नुकसान सोसावे लागत आहे. शहरातील गल्लीबोळातील रस्त्यांची दुरावस्था झाल्या असल्याच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत.#khabarkatta chandrapur

शहरातील मुख्य मार्गच असा असेल तर गल्लीबोळातील रस्त्यांचा विचारच करायला नको असे वाटते आहे.रस्त्यांच्या देखभालीसाठी बांधकाम विभाग असून ही रस्त्याची समस्या वर्षानुवर्षे भेडसावत आहे.नागरिकांकडून शहरातील खड्याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले असून नगरपरिषद प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सिमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील काही ठिकाण हे शहराचा भागच आहेत हे नगरपरिषद प्रशासन/अधिकारी जनप्रतिनिधी विसरलेले दिसत आहे. जनप्रतिनिधीना तर फक्त मतदानासाठी हा भाग आहे असे वाटते, कारण फक्त जनप्रतिनिधी निवडणुकीच्या वेळेस इकडे भटकतात.प्रभाग क्रमांक 6 वार्ड क्रमांक 2 येथिल आठवडी बाजारातील मोठया नालीला लागून असलेला रस्ता कधी बनणार असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.या रस्त्यावर रहदारी करणारे अंदाजे 90 ते 100 घरे आहेत.

साधारण 450 ते 500 लोकसंख्या आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी हि संख्या हजारोच्या घरात जाते परन्तु या परीसरात स्वत:चा हक्काचा रस्ताच नाही आहे.रस्त्यावर प्रचंड खड्डे पडून नसलेल्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. येथून जाताना रुग्ण, वयस्क आणि नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे, पावसाळ्यात तर अजूनच अवाक् करणारी परिस्थीती निर्माण होते, रस्त्याला चक्क तलावाचे स्वरूप येते.


Pages