महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नावीन्यता विभागातर्फे नियोयोजित समितीवर माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस यांची तज्ज्ञ सदस्य नियुक्ती shobha-fadanvis - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नावीन्यता विभागातर्फे नियोयोजित समितीवर माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस यांची तज्ज्ञ सदस्य नियुक्ती shobha-fadanvis

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसरी व तिसरी पाळी आणि उर्वरित औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसरी पाळी ऑगस्ट २०१० सत्रा पासून सुरू करण्यासाठी दुसऱ्या व तिसऱ्या पाळीत १२३९ व्यवसाय तुकड्यांसाठी आवश्यक असलेल्या १२३९ शिल्पनिर्देशक, ५७ गटनिदेशक, २०४ गणित व चित्रकला निदेशक अशा कंत्राटी एकूण १५०० शिक्षकीय पदांच्या निर्मितीस (दरमहा रू. १५०००/- या ठोक मासिक वेतनावर) व त्यासाठी लागणाऱ्या एकूण रू. २४८०.९६ लक्ष इतक्या खर्चास विविध अटींस अधिन राहून दि. २३/०८/२०१० च्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे.

तथापि, सदर कंत्राटी निदेशक संघर्ष समिती यांनी शासनाला दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसरी व तिसरी पाळी साठी कंत्राटी तत्वावर घेण्यात आलेल्या शिल्पनिदेशकांचे शासन सेवेत नियमित करणेबाबत मागणीच्या अनुषंगाने मंत्रिमंडळाच्या दिनांक १६.०५.२०२३ रोजी झालेल्या बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेले होते.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील कार्यरत कंत्राटी शिल्पनिदेशक यांच्याकडून वेळोवेळी शासन सेवेत नियमित करणेबाबत मागणी करण्यात येते, त्याअनुषंगाने मा. मंत्री. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करुन योग्य तो निर्णय घेण्यात यावा.सदर मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील कार्यरत कंत्राटी शिल्पनिदेशक यांच्याकडून वेळोवेळी शासन सेवेत नियमित करण्याबाबत केलेल्या मागणीच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार खालील समिती नियुक्त करण्यात आली आहे.

अध्यक्ष : मा. मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता अपर मुख्य सचिव, वित्त विभाग

सदस्य : अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग

सदस्य : अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग

सदस्य : प्रधान सचिव, नियोजन विभाग

तज्ज्ञ सदस्य : श्रीमती शोभाताई फडणवीस

सदस्य : सहसचिव / उपसचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता च नाविन्यता विभाग

सदस्य : संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई


Pages