खबरकट्टा/चंद्रपूर:
चंद्रपूर : जिल्हा परिषद आणि महानगर पालिकेच्या शांळामधील शिक्षणाचा दर्जा सुधारावा, येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांना यश आले असून बाबुपेठ येथील मनपाच्या सावित्रीबाई फुले शाळेसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शाळेला सर्वसोयी सुविधायुक्त मॉडल स्कूलमध्ये रुपांतर केल्या जाणार आहे.
जिल्हा परिषद आणि महानगर पालिकेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे खाजगी शाळांप्रमाणे या शाळांमध्येही शिक्षणाचा दर्जा उंचावत अद्यावत सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार
तंत्रज्ञान व सर्व सोयी यांच्या वतीने सातत्याने केली जात होती. बाबुपेठ भागात कामगार वर्ग मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. येथे मनपाची सावित्रीबाई फुले शाळा आहे. सदर शाळा अत्याधुनिक करण्यात यावी याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी आग्रही मागणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली होती. यामागणीचा त्यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून, शाळेच्या अत्याधुनिकरणासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
या निधीतून इमारत दुरुस्ती करणे, संगणक खरेदी, सुसज्ज लॅब, ई-लर्निंग, प्रोजेक्टर स्क्रिन, इंटरॅक्टिव्हबोर्ड तसेच आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा व इतर सोयीसुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे. शहरातील मनपाची गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून या शाळेची ओळख असून, यात आणखी भर पडणार आहे.#khabarkatta chandrapur