खबरकट्टा/चंद्रपूर:
स्वप्नील बबन निमगडे, वय 33 वर्ष, नौकरी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी), पंचायत समीती चंद्रपुर ता. जि. चंद्रपुर यांना लाचेच्या सापळयात रंगेहात अटक
तक्रारकर्ता है मौजा निर्वाळा ता. चंद्रपुर जि. चंद्रपुर येथील रहीवासी असून तकारकर्ता यांचे नावे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन 2021- 2022 या आर्थिक वर्षाकरिता घरकुल मंजुर झाले होते. सदर घरकुल बांधकामाकरीता तकारकर्ता यास चार टप्पायात बांधकामानुसार रक्कम जमा होणार होती. तकारकर्ता यास घरकुल योजनेचे दोन किस्त जमा झाले असून तिसरा टप्पा 45000/- रु. जमा करण्याकरीता गैरअर्जदार स्वप्नील बबन निमगडे, नौकरी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी), पंचायत समीती चंद्रपुर ता. जि. चंद्रपुर यांनी तक्रारदारास 5000/- रु. ची मागणी केल्याचे तकार लावी कार्यालय चंद्रपुर येथे प्राप्त झाली.#khabarkatta chandrapur
प्राप्त तकारीवरून दिनांक 21/07/2023 रोजी केलेल्या पळताळणी कार्यवाही मध्ये गैरअर्जदार स्वप्नील वचन निमगडे यांनी तक्रारदार यास लाच मागणी करून तडजोडीअंती 2000/- रु. स्विकारण्याचे मान्य केल्याचे दिसुन आल्याने सापळा कार्यवाहीदरम्यान गैरअर्जदार स्वप्नील बबन निमगडे, नौकरी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी), पंचायत समीती चंद्रपुर ता. जि. चंद्रपुर यांनी स्वतः लाचरक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पुढील तपास कार्य सुरु आहे.
सदरची कार्यवाही ही राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर, संजय पुरंदरे, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक, श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो. नि. जितेंद्र गुरनुले, सफौ रमेश दुपारे, पोहवा अरुण हटवार, नापोकॉ. नरेशकुमार नन्नावरे, नापोकों, संदेश वाघमारे, रोशन चांदेकर, पो.अ. राकेश जांभुळकर, म.पो.अ. मेघा मोहुर्ले व ला.प्र. बी. चंद्रपुर चालक सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.#khabarkatta chandrapur
यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.