हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे पूला वरील खड्ड्यांना एकनाथ शिंदे यांचे नाव #AAP - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे पूला वरील खड्ड्यांना एकनाथ शिंदे यांचे नाव #AAP

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -

चंद्रपुरात आप पक्षाने विविध मुद्द्याला उचलत नागरिकांचे लक्ष वेधण्याचे काम सुरू केले आहे, नुकतंच आप पक्षाने रामसेतू पूल 6 इंच भेगा गेल्याची बाब जनतेसमोर आणली.

आता शहरातील अविकसित रस्त्यावरील खड्ड्याना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव देत खड्ड्यात वृक्षारोपण करीत आपल्या अनोख्या आंदोलनाने जनतेचे लक्ष वेधले.

चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरील खड्ड्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नामकरणाचा निषेध कार्यक्रम आप कार्यकर्ते मयूर राईकवार यांच्या नेतृत्वात पार पडला.पावसाळी अभियान कार्यक्रम दरम्यान महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष दिपक बेरशेट्टीवर, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष मधुकर साखरकर, चंद्रपूर महानगर युवा अध्यक्ष संतोष बोपचे, चंद्रपूर महानगर उपाध्यक्ष सुनील सदभाय्या, चंद्रपूर महानगर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, चंद्रपूर महानगर सहसचिव सुधीर पाटील, चंद्रपूर महानगर कुषाध्यक्ष स्वप्निल घागरगुंडे, तुकूम वॉर्ड 1 संघटन मंत्री भीमराव मेंढे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Pages