खबरकट्टा/चंद्रपूर:
बल्लारपूर - चंद्रपूर मार्गावरील सन्मित्र सैनिक शाळेजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून जबरदस्त धडक दिली. या अपघातात बीएससीद्वितीय वर्षाला शिकत असलेली विसापूर येथील विद्यार्थिनी ठार झाली. तर तिचे वडील गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवार, दुपारी 4.25 वाजता बल्लारपूर - चंद्रपूर मार्गावर घडली.#khabarkatta chandrapur
वेदांती युवराज चिंचोलकर ( 21, रा. विसापूर, ता. बल्लारपूर) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, युवराज माधव चिंचोलकर असे गंभीर जखमीचे नाव आहे. वेदांती व तिचे वडील युवराज चिंचोलकर हे दुचाकी (एमएच 34 बीएन 5848) ने 'बल्लारपूर चंद्रपूर मार्गावरील सन्मित्र सैनिक शाळेत वेदांतीचा भाऊ कुणाल याच्या 11 वीच्या प्रवेशासाठी गेले. तेथील काम आटोपून राज्य महामार्गाने चंद्रपूरकडे वळले. दरम्यान, अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला मागून जोरदार धडक बसली. अपघातात वेदांती व तिचे वडील गंभीर जखमी झाले. रुग्णवाहिकेतून वेदांती व युवराज यांना चंद्रपूरला शासकीय रुग्णालय येथे उपचारार्थ आणले. त्यावेळी वेदांती हिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.#khabarkatta chandrapur