जिल्ह्यात दारू विक्री दुकानांची गर्दी सामान्य जनतेच्या डोकेदुखी चे कारण बनत असून चंद्रपूर शहरातील नव्याने सुरू होत असलेल्या विविध देशी दारूंचे दुकान,बिअर बार व वाईन शॉप यातील हवाई किंवा पदसंचार अंतराबाबत भूमापन कार्यालयाकडून देण्यात आलेला अहवाल आणि प्रत्यक्षात स्थिती यात तफावत असल्याबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत.
खबरकट्टा / चंद्रपूर : EXCLUSIVE : "नशा" बिअर बार का...!!
जिल्ह्यात दारूबंदी उठली आणि दारू परवानधारकांना रान मोकळे झाले. त्यापूर्वी पाच वर्ष दारूबंदी असताना अनेक अवश्या-गवश्या-नवश्यांनाही दारू चा धंदा म्हणजे प्रचंड प्रॉफिट असा अनुभव आल्याने व्यापारीच नव्हे तर् सामान्यांनाही दारूबंदी उठल्यानंतर दारू विक्री परवाने मागण्यासाठी हजारो अर्ज जिल्हा प्रशासनाकडे दखल झाले. त्यात अनेक राजकीय दलालांनी पार्टनरशिप मागत अनेकांच्या अतृप्त इच्छा पूर्ण करूनही दिल्या.
मात्र आता जिल्ह्यात या दारू विक्री दुकानांची गर्दी सामान्य जनतेच्या डोकेदुखी चे कारण बनत असून चंद्रपूर शहरातील नव्याने सुरू होत असलेल्या विविध देशी दारूंचे दुकान,बिअर बार व वाईन शॉप यातील हवाई किंवा पदसंचार अंतराबाबत भूमापन कार्यालयाकडून देण्यात आलेला अहवाल आणि प्रत्यक्षात स्थिती यात तफावत असल्याबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत.

शहरातील विविध परिसरात आधीच विक्री परवाने असलेली दुकानें, त्यातून परवानाधारकांची फक्त दुकान थाटून मस्त झाले असल्याच्या भावनेतून दुकानातलगत आजूबाजूच्या परिसरात त्यांच्या ग्राहकांनी केलेल्या अतिक्रमणांकडे या मालकांच्या सऱ्हास दुर्लक्ष करत सूरू असलेल्या मुजोऱ्यांमुळे सामान्य नागरिक, महिला, लहान मुले यांना ये-जा करताना रस्त्यांवर होणारा बेवड्यांचा त्रास, काही शाळा परिसरालगत असलेल्या या विक्री दुकानांमुळे मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम शिवाय यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालल्याचे स्पष्ट चित्र प्रशासनाला दिसत नसल्यामुळे सामान्य त्रस्त झाले आहेत.
याच अनुषंगाने टीम खबरकट्टा कडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आम्ही शहरातील काही परिसरातील या विक्री दुकानानांच्या राज्य शासनाने दोन देशी दुकान,बिअर बार व वाईन शॉप या दुकानांमध्ये हवाई अंतराची मर्यादा व त्या नियमानुसार हवाई अंतर असल्यास दुकानांची शासकीय परवानगी करीता भूमी अभिलेख कार्यालय यांचेशी संपर्क साधला असता ही माहिती देण्यास सतत टाळाटाळ करण्यात आली.
त्यामुळे हे कार्य आमच्या टीम ने प्रत्यक्ष हाती घेत सद्यस्थितीत अंदाजे 1लक्ष लोकसंख्या असलेल्या बंगाली कॅम्प हे नवे दारू हब बनत असल्याचे या दुकानांच्या संख्येवरून स्पष्ट होते.बंगाली कॅम्प परिसरात संजय नगर, कृष्णा नगर, इंदिरा नगर, अष्टभुजा, चंद्रपूर-बल्लारपूर बायपास रोड,मूल रोड इंडस्ट्रीयल एरिया, शास्त्री नगर, उत्तम नगर, सरकार नगर, विवेक नगर येथे सूरू असलेल्या एक वाईन शॉप, चार देशी दारू विक्री परवाने, तीन बिअर बार आणि चार बिअर शॉपी चे आपापसातील हवाई व पदसंचार अंतर मोजून दाखविण्याची रीतसर मागणी तेथील नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
शासनाने निर्धारित केलेल्या दोन दुकानांमधील हवाई अंतर निकषानुसार या परिसरात नव्याने परवानगी मागितलेल्या दोन बिअर बार (संकेत पोद्दार यांच्या मालकीची व नशा बिअर बार ), श्री. राऊत यांच्या मालकिचा देशी दारू विक्री परवाना आणि व्यंकटेश मारपल्लीवार यांच्या मालकीचा देशी दारू विक्री परवाना यांचे हवाई अंतर मोजणीचे अहवाल आपल्या कार्यालयाने राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर कार्यालयाला सादर केल्यामुळे,या अहवालांच्या आधारावर वरील सर्व परवाणग्या देण्यात येऊन सदर परवाने धारकांनी प्रत्यक्ष दुकाने थाटण्याची कार्यवाही मोका स्थळी सूरू केली आहे.
परंतु, बंगाली कॅम्प परिसर हा चंद्रपूर शहरातील सर्वात जास्त वर्दळ असलेला चौरस्ता असून दाटीवाटीच्या लोकवस्तीचा परिसर आहे शिवाय बंगाली कॅम्प पोलीस चौकी परिसरात गुन्हेगारीच्या घटना वाढत्या क्रमांकावर असल्याने, कमीक्षेत्रफळात मद्य विक्री दुकानांची रिघ वाढल्यामुळे महिला व नागरिक त्रस्त झालेले आहेत.तसेंच परिसरात अनेक धार्मिक स्थळे व शाळा, कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांना याचा त्रास होण्याच्या शक्यतेने पालक चिंताक्रांत झालेले असल्याने परिसरातील नागरिकांनी या सर्व जुन्या ते नवीन परवान्यांच्या प्रत्यक्ष हवाई व पदसंचार अंतराबाबत नागरिकांना शंका असल्याने त्यांनी जिल्हा प्रशासन व पालकमंत्री यांच्याकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत.
1)चंद्रपूर-मूल मार्गावरील श्री. पोद्दार यांच्या इमारतीत श्री. राऊत यांच्या मालकीचा देशी दारू विक्री परवाना सूरू स्थितीत आलेल्या इमारतीतील संकेत पोद्दार यांच्या मालकीचा बिअर बार परवाना ते चंद्रपूर पब्लिक स्कूल, महाकाली मंदिर व बजाज फार्मसी कॉलेज,मूल रोड, चंद्रपूर
2) नेताजी सुभाषचंद्र चौरस्ता बंगाली कॅम्प चौकातील संजय पिसे यांच्या मालकीचा नशा बिअर बार परवाना ते श्री. बाबा विश्वकर्मा मंदिर,चंद्रपूर-बल्लारपूर बायपास रोड, चंद्रपूर.
3) बायपास रोड वरील व्यंकटेश मारपल्लीवार यांचा देशी दारू विक्री परवाना ते ए. ओ. डांगे देशी दारू विक्री परवाना (CL-367)
वरील नमूद सर्व मद्य विक्री परवान्यांचे "एफ एल - अनुद्यप्ती" स्थलांतरच्या् निकषाशानुसार आपआपसातील तसेंच परिसरातील सर्व धार्मिक व शैक्षणिक स्थळांचे प्रत्यक्ष नागरिकांच्या उपस्थितीत हवाई व पदसंचार अंतर मोजून दाखविण्यात यावे. त्यानंतरच या नव्या मद्य विक्री परवान्यांना परवानगी देण्यात यावी अन्यथा आपल्याला कार्यालयासमोर नागरिकांचे तीव्र आंदोलन करण्यात येईल. या नंतर उद्भवनाऱ्या परिस्थितीस आपले कार्यालय जबाबदार राहील असा लेखी इशारा बंगाली कॅम्प नागरिकांनी दिला आहे.
या वरील सर्व विक्री परवाना धारकांच्या एकमेकांपासून शासकीय निकषानुसार असलेल्या अंतरात व भूमी अभिलेखगारांनी शासनाला सादर केलेल्या अहवालत प्रचंड ताफावत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. व हे सर्व अहवाल मिळवून देण्याकरिता कार्यालयात अनेक दलाल निर्माण झाले असून ते कोणत्याही नवीन परवानगी अहवालचे दर पत्रक घेऊन फिरत असल्याचे आमच्या पाहणीत आले.
या मागणीस प्रत्यक्ष पाहणी झाल्यास वरील सर्व विक्री परवान्यांचे भूमी अभिलेख कार्यालय सामान्य जनतेसमोर सोक्ष-मोक्ष करेल काय??? हे पाहणे ओत्सुक्याचे ठरेलं!