महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी भरती २०२३.
⇒ पदाचे नाव: तलाठी.
⇒ एकूण रिक्त पदे: 4644 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.
⇒ शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा ०२) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
⇒ वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.
⇒ वेतन/ मानधन:रु, 25,500/- ते रु. 81,100/-.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
⇒ अर्ज शुल्क: खुलाप्रवर्ग: ₹ 1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹ 900/-.
⇒ ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: 15 जून २०२३ (संभवत).
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: जुलै २०२३ (लवकरच उपलब्ध होईल).
दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने प्रारूप जाहिरातीचा नमुना प्रसिद्ध झाला असून, त्याद्वारे चार हजार ६२५ तलाठ्यांच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. mahabhumi.gov.in या साइटवर ही जाहिरात आल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. वास्तविक, अशा प्रकारची कोणतीही जाहिरात या साइटवर उपलब्ध नाही. यासंदर्भात अधिक चौकशी केली असता, अशा प्रकारची कोणतीही जाहिरात शासनाच्या वतीने प्रसिद्ध झाली नसल्याचे एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे "हि जाहिरात खरी कि खोटी या संभ्रमात उमेदवार आहेत". तसे अन्य सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार लवकरच तलाठी भरती जाहिरात येणे अपेक्षित आहे. सध्या Draft जाहिरात तयार आहे असे समजते. या संदर्भातील पूर्ण अपडेट आम्ही खबरकट्टा वर लवकरच प्रकाशित करू. तसेच उमेदवारांना आवाहन आहे कि अधिकृत जाहिरात येईल पर्यंत कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.अर्ज सुरु होण्याची तारीख आणि पुढील अपडेट आम्ही खबरकट्टा वर प्रकाशित करूच.